Fake News: मतदान न केल्यास मतदाराच्या खात्यातून पैसे कापणार? व्हायरल मॅसेजमागील सत्य समोर
Fake News: कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Fake News: कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचबरोबर सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातोय. याचदरम्यान, सोशल मीडियावर मतदानसंदर्भात एक मॅसेज प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. ज्यात मतदान न करणाऱ्या मतदाराच्या खात्यातून पैसे कापले जाणार असल्याचं सांगितलं जातंय. यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय.
"मतदान न करणाऱ्या मतदाराच्या खात्यातून 350 रुपये कापले जाणार", असा मॅसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. याप्रकरणी निवडणूक आयोगानं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे तक्रार दाखल केलीय. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटनं या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय, अशीही माहिती त्यांनी दिलीय.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत निवडणूक आयोगाने दिल्ली आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची आणि हा संदेश प्रसारित करण्यामागील हेतू शोधण्याची विनंती केलीय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांतील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अशा प्रकारचे मॅसेज व्हायरल केले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगानेही अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाल्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-