Cyber Fraud Alert: तुम्हालाही 'फ्री लॅपटॉप'चा मॅसेज आलाय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Cyber Fraud Alert: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारकडून महत्वाची पावलं उचलली जात आहेत.
Cyber Fraud Alert: कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. मात्र, दुसरीकडे सायबर गुन्हेगारीचं (Cyber Crime) जाळ अधिक वेगानं पसरू लागलंय. सायबर गुन्हेगार मानसिक दृष्टीनं कमजोर असलेल्या नागरिकांना लक्ष्य करतात. त्यानंतर वेगवेगळे मार्ग अवलंबवत त्यांची फसवणूक करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मॅसेज प्रंचड व्हायरल होतोय. ज्यात केंद्र सरकारकडून मोफत लॅपटॉप (Free Laptop) दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. हा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर, वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमच्या खात्यातील पैसे गायब होण्याची शक्यता आहे.
व्हायरल मॅसेजमध्ये काय लिहलंय?
सध्या व्हॉट्सअपवर एक मॅसेज प्रचंड वेगानं व्हायरल होतोय. ज्यात पंतप्रधान लॅपटॉप वितरण योजनेअंतर्गत मोफत लॅपटॉप देण्यात येत आहे, असं सांगितलं जातंय. या मॅसेजच्या शेवटी एक लिंक देण्यात आलीय. या लिंकवर क्लिक करून लॅपटॉपसाठी अर्ज करता येईल, असंही सांगितलं जातंय.
पीआयबीने हा मॅसेज बनावट असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तसेच केंद्र सरकारकने अशी कोणतीही योजना सुरू केली नसल्याचे त्यांनी म्हटलंय. सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्यांना हा मॅसेज पाठवत आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे.तसेच हा मॅसेज फॉरवर्ड किंवा शेअर न करण्याचे पीआयबीने आवाहन केलंय.
दरम्यान, सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारकडून महत्वाची पावलं उचलली जात आहेत. तसेच नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्याही मॅसेजला बळी पडू नये. अन्यथा त्यांच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. यामुळे कोणताही व्यवहार करताना नागरिकांनी त्याची खात्री करून घ्यावी, असंही वारंवार सांगितलं जातंय.
हे देखील वाचा-
- Tips for Free WI-FI : फ्री वाय-फाय वापरताय? सावध व्हा! हॅकर्स चोरू शकतात पर्सनल डेटा
- SmartPhone Tips : मोबाईलसारखा हॅंग होतो? जाणून घ्या फोनचा स्पिड वाढवण्याची ट्रिक
- WhatsApp Features : व्हॉट्सअॅपचे नवे फिचर्स; यूझर्ससाठी पर्वणी, काय आहे खास