SBI Alert: एसबीसीआयच्या ग्राहकांनो सावधान! एका चुकीमुळं तुमचं खातं होईल रिकाम
SBI Alert: कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात (Digital Transaction) मोठी वाढ झालीय. मात्र, दुसरीकडं सायबर गुन्हेगाराचं जाळ अधिक वेगानं पसरताना दिसत आहे.
कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात (Digital Transaction) मोठी वाढ झालीय. मात्र, दुसरीकडं सायबर गुन्हेगाराचं जाळ अधिक वेगानं पसरताना दिसत आहे. सायबर गुन्हेगार मानसिक दृष्टीनं कमजोर असलेल्या नागरिकांना लक्ष्य करतात. तसेच ऑफर, गिफ्ट्सचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक (Fraud) करतात. याचदरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank Of India) त्यांच्या खातेदारांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. एखादी चूक ग्राहकांना महागात पडू शकते. यामुळं ग्राहकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? हे देखील एसबीआयनं त्यांच्या खातेदारांना सांगितलंय.
ग्राहक त्यांच्या खात्यातील पैसे कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवू शकतात आणि ऑनलाईन फसवणुकीपासून कशा पद्धतीनं वाचता येईल? याची माहिती एसबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिलीय. ग्राहकांनी मोफत भेटवस्तू किंवा व्हाउचरच्या भूलथापांना बळी पडू नये. सायबर गुन्हेगार अनेकदा मोफत भेटवस्तू आणि व्हाउचरचं आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करतात. दरम्यान, भेटवस्तू मिळवण्यासाठी अनेकजण अज्ञात लिंकवर क्लिक करतात आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.
एसबीआयनं शेअर केलेल्या माहितीत असं म्हटलंय की, एसबीआय त्यांच्या ग्राहकांकडून डेबिट कार्ड तपशील, इंटरनेट बँकिंग, ओटीपी यांसारखी संवेदनशील माहिती कधीही विचारत नाही. याशिवाय, कोणत्याही थर्ड पार्टीच्या लिंकवर क्लिक करण्याचा मेसेजही पाठवत नाही. तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे तपशील कोणाशीही शेअर करण्याची गरज नाही. महत्वाचं म्हणजे, ग्राहकांनी अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. तसेच बनावट बँक ईमेलला रिप्लाई न देण्याचं आवाहन केलंय.
ऑनलाईन फसवणुकीच्या संबंधित तक्रार सायबर क्राइम विभागाकडे केली जाते. तसेच सायबर क्राईम वेबसाईट https://cybercrime.gov.in किंवा हेल्पलाईन क्रमांक 155260 वर देखील तक्रार नोंदवता येऊ शकते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-