एक्स्प्लोर

Today In History : नोबल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय रविंद्रनाथ टागोर यांची पुण्यातिथी; इतिहासात आज

What Happened on 7th August : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते.

What Happened on August 7th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आजच्याच दिवशी मुंबई महानगर पालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती. तसेच श्रीहरिकोटा येथून पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

रविंद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी 

भारताचं राष्ट्रगीत जन गन मन याची रचना ज्यांनी केली असे महान कवी म्हणजेच रविंद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी आहे. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी आणि संगीतकार म्हणून रविंद्रनाथ टागोर यांचा नावलौकिक होता. तसेच नोबेल पुरस्कार मिळवणारे आशियातील पहिले नागरिक होते. त्यांनी लिहिलेल्या गीतांजली या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यांनी बांग्लादेशाचे  आमार सोनार बांग्ला या राष्ट्रगीताची देखील रचना केली आहे. ब्रिटीश सरकारकडून त्यांना सर हा किताब दिला होता. पण  जालियानवाला बाग हत्याकंडामुळे त्यांनी हा किताब सरकारला परत दिला होता. 

शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन

भेंडीबाजार घरण्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका म्हणून अंजनीबाई मालपेकर यांचं नाव होतं. अंजनीबाईंनी नजीरखाँ, खादिमा आणि हुसेनखाँ या त्यांच्या तीन भावडांकडून संगीताचं बाळकडून घेतलं. 1858 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप देऊन गौरवण्यात आलं होतं. या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या त्या पहिला महिला ठरल्या होत्या. त्यांच्या तारुण्याचं वर्णन करणारी अनेक चित्रं  राजा रविवर्मा आणि माधव विश्वनाथ धुरंधर यांनी रेखाटली आहेत. भेंडीबाजार घराण्याची ख्याती ही त्यांच्या गायिकीमुळे वाढली असल्याचं सांगण्यात येतं. तसेच त्यांनी  कुमार गंधर्व आणि किशोरी आमोणकर यांसारख्या अनेक गायकांना संगीताचे धडे दिले आहेत. 

गुलशन बावरा यांचं निधन 

प्रसिद्ध गीतकार गुलशन कुमार मेहता अर्थातच गुलशन बावरा म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक सुवर्णकाळ म्हणून नावाजले जातात. त्यांनी त्यांच्या लेखनाच्या कारकिर्दीमध्ये  एकूण 240 चित्रपटांसाठी गीतांची रचना केली आहे. त्यामधील अनेक गीतांना  आर.डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या सुरांची देण लाभली आहे. सट्टा बाजार या चित्रपटामुळे त्यांनी खरी ओळख मिळाली.जंजीर या चित्रपटातील प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी तसेच  उपकार या चित्रपटातील मेरे देश की धरती ही त्यांची काही प्रसिद्ध गीते आहेत.  

बेस्ट कंपनी महानगरपालिकेच्या ताब्यात

बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम ही मुंबईची दळणवळण आणि विद्युत सेवा पुरवणारी सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. आजच्या दिवशी ही कंपनी मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतली होती. बेस्टचा जन्म हा 1873 मध्ये ट्रामवे कंपनीच्या स्वरुपात झाला होता. दरम्यान याच बेस्ट कंपनीची पहिली बस ही  15 जुलै 1926 मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र ही कंपनी मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतलं. 

आजच्या दिवशी घडलेल्या इतर घडामोडी

1753 : साली ब्रिटीश वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली.

1912 :  भारतीय हृदयरोगाचे प्रणेते आणि मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक तसेच, ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनचे संस्थापक संचालक केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्मदिन.

1925 : पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्रशासक तसेच, भारतातील हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिन.

1985 : साली भारतीय बिलियर्डस खेळाडू गीत सेठी हे वर्ल्ड अ‍ॅमेच्योर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारे तिसरे भारतीय खेळाडू ठरले.

1991 :  ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Embed widget