एक्स्प्लोर

बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल?

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई : पैशांची अफरातफर विरोधी नियमांनुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याच्या वृत्ताचं आरबीआयने खंडन केलं आहे. माध्यमांमध्ये कथित आरटीआयच्या आधारावर बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र यावर आता आरबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक न केल्यास काय होईल? बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी तुम्ही आधार कार्ड लिंक न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तर तुमचं बँक खातं पुन्हा चालू होईल. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतरच पुन्हा खातं सुरु होईल, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र या सर्व प्रक्रियेसाठी किती वेळ जाईल, याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. बँक खातं आणि आधार लिंकचं स्टेटस कसं चेक कराल?
  • आधारच्या www.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला बँकिंग स्टेटस चेक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका
  • सिक्युरिटी कोड टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग स्टेटस दिसेल.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुनही तुम्ही हे स्टेटस पाहू शकता
  • *99*99*1# हा क्रमांक त्यासाठी डायल करावा लागेल.
  • हा क्रमांक डायल केल्यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर तो अचूक आहे का, याची खात्री करण्यासाठी ‘कंफर्म’ हा पर्याय निवडावा लागेल.
  • पुढे गेल्यानंतर तुमचा आधार नंबर लिंक केलेला असेल तर स्टेटस दाखवलं जाईल.
एकाच आधार नंबरशी लिंक केलेले अनेक खाती असू शकतात. मात्र तुम्ही शेवटचं लिंक केलेलं खातं यामध्ये दाखवलं जाईल. तुम्हाला तुमच्या सर्व खात्यांची माहिती पाहिजे असेल, तर बँकेत जावं लागेल. दरम्यान आधार कार्ड लिंक न केल्यानंतर सर्व खाती बंद होणार नाहीत. काही खात्यांना यामध्ये सूटही देण्यात आलेली आहे. मात्र याबाबत नेमकी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. बँक खात्याशी आधार कार्ड कसं लिंक कराल? आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही एटीएमच्या माध्यमातूनही आधार कार्ड खात्याशी लिंक करु शकता. मात्र एटीएमच्या माध्यमातून शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्डची फोटोकॉपी देऊन ही प्रक्रिया करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Embed widget