एक्स्प्लोर

आपण कोरोना व्हायरस सोबत जगायला शिकलं पाहिजे : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येने आज 56 हजारांचा आकडा ओलांडला आहे. अशातचं केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे. आपण कोरोना व्हायरस सोबत जगायला शिकलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 56 हजारांच्या पुढे गेला असून आतापर्यंत 1886 लोकांचा यात बळी गेलाय. मागच्या 24 तासांमध्ये तब्बल 3390 नवीन लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशातचं केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांचं एक महत्वाचं वक्तव्य आलं आहे. आपण कोरोना व्हायरस सोबत जगायला शिकलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मुंबईतील वाढती कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता केंद्राची टीम दर आठवड्याला मुंबईत येणार आहे. आज या टीमसोबत सहसचिव लव अग्रवाल आले होते.

संपूर्ण भारतात तिसऱ्या टाळेबंदीच्या टप्प्यात लोकांचा जीव फारसा रमताना दिसत नाही, प्रत्येकजण कंटाळलाय, लॉकडाउनच्या नावाने बोटं मोडतोय, संयम किती दिवस बाळगायचा अशा चर्चा सध्या व्हाट्सअॅप ग्रुपवर रंगतायत. काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी एक वेबीनारला संबोधित करताना सांगितले की, भारताला कोरोना विषाणूंसोबत जगायला शिकावे लागेल. कारण अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोना हा काही दिवसात संपुष्टात येणार विषय नाही, हळूहळू याचे प्रमाण कमी होईल.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचे उरलेले पेपर 'या' तारखांना होणार

मूर्ती यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे सूतोवाच काही दिवसांपूर्वीच केले आहे. अशातचं आता केंद्रीय मंत्रालयाकडूनही तसेच वक्तव्य आल्याने लॉकडाऊन लवकरचं उठवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीशा त्यांच्या मजुरांना स्वीकारायला तयार नाही : बाळासाहेब थोरात

कोरोनाचा विळखा वाढतोय देशात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आताच्या घडीला देशभरात 56342 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पैकी 1886 रुग्णांचा यात बळी गेलाय. तर, 15539 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनाचा डबलिंग रेट वाढला आहे. दरम्यान, देशात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या 45 दिवसांपासून संपूर्ण भारत बंद असल्याने देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. परिणामी लॉकडाऊन उठवण्यावाचून आता पर्याय उरला नसल्याचे तज्ञांचे मत आहे.

Balasaheb Thorat | गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा त्यांच्या मजुरांना स्वीकारायला तयार नाही : बाळासाहेब थोरात

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget