Viral Video : सावधान! नागाच्या शेपटीवरुन त्याच्या ताकतीचा अंदाज लावताय? मग हा व्हिडीओ पहाच
Viral Video : घरात जाणाऱ्या एका लहान दिसणाऱ्या नागाच्या (snake) शेपटीला एक युवक पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो नाग फणा काढून असं काही रौद्र रुप धारण करतो त्यामुळे युवकाची चांगलीच भंबेरी उडते.
मुंबई : साप किंवा नाग म्हटल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय, अनेकांचा थरकाप उडतोय. पण काहीजण असे असतात की ते या सापांना सहज पकडतात, त्यांच्याशी खेळतात. पण ही सवय काहीजणांच्या अंगलट येऊन आपला जीव गमावण्याची शक्यता असते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून एक युवक नागाच्या शेपटीला धरुन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. पण अगदी लहान वाटणारा हा नाग हा ज्यावेळी फणा काढून उभा राहतो त्यावेळी त्या युवकाची भंबेरी उडते.
एका घरात एक नाग शिरत असून त्याची शेपटी घराबाहेर दिसतेय. अशावेळी एक युवक त्या नागाला पकण्याचा प्रयत्न करतोय. त्याने आपल्या हातातली काठी बाजूला ठेवली आणि हाताने त्या नागाच्या शेपटीला पकडले. त्याचवेळी घराच्या आत असलेल्या या नागाने एकदम बाहेर येऊन चांगला अडीच-तीन फुटाचा फणा काढल्याचं दिसतं. नागाचे ते रौद्र रुप पाहून त्या युवकाची चांगलीच भंबेरी उडाल्याचं दिसतंय. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या युवकाचे प्राण वाचले.
Never Judge a snake by it's tail ?@Pendrive_Baba pic.twitter.com/ytet6ps7bg
— Jude David (@judedavid21) September 6, 2021
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामुळे पाहणाऱ्याच्याही काळजाचा ठोका चुकतोय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजलं नाही पण यामुळे सापाशी खेळणाऱ्या लोकांना एक धडा मिळतोय हे नक्की.
आपल्यापैकी अनेकजण कोणतेही प्रशिक्षण न घेतो केवळ मज्जा म्हणून साप वा नागाला पकडण्याचे प्रयत्न करतात. त्यावेळी शास्त्रीय प्रशिक्षण नसल्याने त्या सापांना कसेही पकडले जाते, त्यामध्ये त्यांना इजा होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. पण या अशा प्रकारात त्या व्यक्तीचा जीवही जाण्याची शक्यता जास्त असते.
संबंधित बातम्या :