Fact Check : तालिबान्यांनी फाशी देत हेलिकॉप्टरला लटकावलं? नाही, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागचं 'हे' सत्य
Viral Video : तालिबान्यांनी अमेरिकेला मदत करणाऱ्या एका अफगाणी नागरिकाला फाशी देऊन, त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला बांधून फिरवत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जाणून घेऊया त्यामागचं नेमकं सत्य.
काबुल : तब्बल 20 वर्षांनी अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपला गाशा गुंडाळला. 30 ऑगस्टला अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाने अफगाणिस्तान सोडलं आणि खऱ्या अर्थाने तालिबान्यांच्या हातात सत्ता गेली. आता वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून तालिबान्यांचा क्रुर चेहरा समोर येत आहे. अशातच अमेरिकेला मदत केल्याचा ठपका ठेवत कंदहारमध्ये एका अफगाणी नागरिकाला तालिबान्यांनी फाशी दिली आणि नंतर हेलिकॉप्टरला लटकावून शहरभर फिरवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. आता त्या व्हिडीओमागचं नेमकं सत्य बाहेर आलं आहे.
सोशन मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एका व्यक्तीला हेलिकॉप्टरला दोरीला लटकवलेलं दिसत आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तात असं सांगण्यात येत होतं की, अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तालिबान्यांनी हे कृत्य केलं आहे. यामध्ये त्या व्यक्तीला फाशी दिली आणि हेलिकॉप्टरला लटकवलं आणि शहरभर फिरवलं असंही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं होतं.
काय आहे नेमकं सत्य?
ज्या हेलिकॉप्टरला ती व्यक्ती लटकलेली दिसत आहे ते हेलिकॉप्टर हे अमिरेकन हॉक आहे. त्या हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती हा आकाशात तालिबानी झेंडा फडकवत होता. तसेच एका इमारतीवर तो तालिबानी झेंडा लावण्याचा प्रयत्न करत होता पण त्यामध्ये त्याला यश आलं नाही.
What appears to be a zoomed in version of a viral video of a man dangling from a helicopter in Afghanistan shows him moving and waving. This, along with other photos of a similar scene, dispel the online narrative that he was hanged by the Taliban https://t.co/BYNVsGcBye
— Reuters Fact Check (@ReutersFacts) August 31, 2021
तालिबानने दिली भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी
भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास यांच्यात एक बैठक पार पडली. त्यामध्ये तालिबानकडून भारतीयांच्या सुरक्षतेची आणि घरवापसीची हमी देण्यात आली आहे. तालिबानला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध हवं असल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत आमचा शत्रू नाही आणि आम्हाला भारताशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत असं तालिबानकडून या आधी स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :