Viral Video : शेतकऱ्यांचं सरळ डोकं फोडायचं, संकोच करायचा नाही; कलेक्टरांचा आदेश
कर्नालमध्ये शनिवारी शेतकऱ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा पूर्वनियोजित असल्याचं एका व्हायरल व्हिडीओवरुन स्पष्ट झालंय. या व्हिडीओत कलेक्टर हे पोलिसांना शेतकऱ्यांचे डोकं फोडायचा आदेश देत आहेत.
कर्नाल : मी ड्युटी मॅजिस्ट्रेट आहे, लिखित स्वरुपात आदेश देतोय. आंदोलकांचं सरळ डोकं फोडायचं, त्यांना पकडून-पकडून मारायचं, कोणताही संकोच करायचा नाही. हा आदेश कोणत्या ब्रिटिशकालीन जनरल डायरचा नाही तर कर्नालच्या डीएम म्हणजे डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट आयुष सिन्हा यांचा आहे. शनिवारी कर्नालमध्ये पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्याच्या आधीचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
कर्नालमध्ये शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज हा पूर्वनियोजित असल्याचं कलेक्टर आयुष सिन्हा यांच्या या व्हायरल व्हिडीओवरुन स्पष्ट होतंय. या व्हिडीओमध्ये आयुष सिन्हा पोलिस कर्मचाऱ्यांना म्हणतात की, "बॅरिकेट्स ओलांडून कुणीही आत यायचा प्रयत्न केला तर सरळ त्याचं डोकं फोडायचं, कोणताही संकोच करायचं नाही. मी ड्यूटी मॅजिस्ट्रेट आहे. हे आदेश मी लिखित स्वरुपात देतोय."
Viral Video : चालत्या रिक्षात घुसून तरुणीला केलं Kiss, सोशल मीडियात व्यक्त होतोय संताप
मी पूर्ण रात्र झोपलो नाही, म्हणून...
आयुष सिन्हा पुढे म्हणतात की, "आम्ही पुर्ण रात्रभर झोपलो नाही, दोन दिवस झालं ड्युटी करतोय. या रेषेच्या पलिकडे एकही व्यक्ती गेला नाही पाहिजे. आणि जर गेलाच तर त्याचं डोकं फुटालेलं असायला हवं. प्रत्येकाला पकडून सरळ त्याचं डोकं फोडायचं."
I hope this video is edited and the DM did not say this… Otherwise, this is unacceptable in democratic India to do to our own citizens. pic.twitter.com/rWRFSD2FRH
— Varun Gandhi (@varungandhi80) August 28, 2021
पोलिसांनी डीएमच्या आदेशावरुन लाठीचार्ज केल्यानंतर माध्यमांनी या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत आयुष सिन्हा यांना विचारलं. त्यावर आपण हा व्हिडिओ पाहिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. व्हिडीओमध्ये सरळ डोकं फोडण्याचा आदेश देणारे आयएएस अधिकारी आयुष सिन्हा माध्यमांना सांगतात की, पहिला पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करायचा असा आदेश दिला होता. त्यानंतर जर शेतकऱ्यांकडून दगडफेक झालीच तर त्यावेळी लाठीचार्जचा आदेश दिला होता.
Viral Video : चटकदार पाणीपुरी खाताय? मग हा व्हिडीओ बघाच...विक्रेत्याने पाणीपुरीत मिसळली लघवी
भाजप नेत्यांच्या विरोधात आंदोलन करायला गेले होते शेतकरी
हरयाणामध्ये सध्या पंचायत निवडणुकींची धामधूम सुरु आहे. याच संदर्भात भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांची कर्नालमध्ये शनिवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, प्रदेशाध्यक्ष आणि अनेक आमदार-खासदार उपस्थित राहणार होते.
या बैठकीची माहिती मिळताच शुक्रवार संध्याकाळपासूनच शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमा होऊन आंदोलनाची तयारी सुरु केली होती. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मग शेतकऱ्यांनी 44 नंबरच्या नॅशनल हायवेवर बस्ताडा टोल नाक्यावर आंदोलन सुरु केलं.
यावेळी हरयाणा पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले. अनेकांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. यावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
Viral Video : धक्कादायक! ज्येष्ठ नागरिकाला पकडलं, मारलं आणि लुटलं; गुन्हेगार अद्याप मोकाट