एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती?

जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचे व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या चॅटमधून दिसत आहे. कोडवर्डच्या माध्यमातून याची रणनीती आखण्यात आली होती. दिल्ली पोलिसांकडून 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(JNU)मास्कधारी गुडांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित होता. कोडवर्डच्या माध्यमातून याची रणनीती आखण्यात आली होती, अशी माहिती दिल्ली तपासात समोर आली आहे. बाहेरुन विद्यापीठात घुसलेल्या लोकांना कोडवर्ड देण्यात आले होते. जेणेकरुन हल्लेखोर आपल्या लोकांना ओळखतील आणि त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत. सुत्रांच्या माहितीनुसार, याअगोदर जेव्हा पेरियार होस्टलमध्ये मास्कधारी गुंडांनी हल्ला केला त्यानंतर या हल्ल्याचं प्लॅनिंग झालं. व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या या नियोजनाचे स्क्रीन शॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एबीपी न्यूजने या स्क्रीन शॉट्सचा तपास केला. तपासात समोर आलेल्या गोष्टी - स्क्रीन शॉट्सनुसार, या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव Friends of RSS आहे. यात लिहलं आहे. डाव्या दहशतीच्या विरोधात लढण्यासाठी ग्रुप जॉईन करा. या लोकांना पकडून मार देणे हाच उपाय आहे. यानंतर एकाने लिहलंय डीयूच्या लोकांचा प्रवेश तुम्ही खजन सिंह स्वीमिंगच्या बाजूने करुन द्या आम्ही इथं 25-30 जण आहोत. व्हायरल झालेल्या या स्क्रीन शॉट्समध्ये एका ग्रुपचं नाव एबीवीपी आहे. यात वेगवेगळे तीन लोकांनी चॅट केलीय. ग्रुपमध्ये एकानं विचारलं- काय झालं? दुसऱ्यानं विचारलं- भाई पैसे किती मिळतील? तर, तिसऱ्यानं लिहलंय - जय श्री राम याचप्रमाणे आणखी एक ग्रुपची चॅट व्हायरल झाली आहे. Unity Against Left, असं या ग्रुपचं नाव आहे. ग्रुपमध्ये एकानं लिहलंय- आजची मॅच कशी झाली? उत्तर आलं - आतापर्यंत मस्त, गेटवर काहीतरी करायला हवं बोला, काय करायला हवं? कोणी दुसऱ्यानं लिहलं- तुम्ही कुठे आहात? उत्तर आलं - साबरमतीच्या मागे. विचारलं गेलं- स्टेटस काय आहे सध्या? पोलीस आली नाही ना? उत्तर आलं- वीसीने प्रवेश नाकारला, आपला वीसी आहे. असं नाहीये की राईट विंगच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे चॅट व्हायरल झालेत. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे चॅट देखील व्हायरल झाले आहेत. या ग्रुपचं नाव आहे. Core Group यात चारजण आपसात चर्चा करत आहेत. एकाने लिहलं - जामिया आणि डीयूमधून येणारे कॉम्रेड मेन गेटने येऊ नका, आयआयएमसी किंवा मॉल गेटने आत या. उत्तर आलं - सध्या संघी गुंडांच्या मारहाणीचा ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे. तिसऱ्यानं लिहलं- कॉम्रेड तुम्ही रॉड आणि काठ्यांसह या. चौथ्यानं लिहलं- 100 पेक्षा जास्त कॉम्रेड गरजेच्या सामानासह जेएनयूला पोहचणार आहे. संघी गुंडांसाठी परिस्थिती अवघड आहे. कॉम्रेड आपण योग्य मार्गावर जात आहोत. त्यानंतर जेएनयूमध्ये प्रवेशासाठी संदेश लिहण्यात आला- आम्ही मॉलच्या गेटजवळ पोहचणार आहोत. कृपया जेएनयूच्या काही अधिकृत विद्यार्थ्यांना आमच्या एन्ट्रीसाठी पाठवा. आपल्याला 10-10 लोकांचे ग्रुप तयार करुन पहाटे 4-5 वाजता प्लॅननुसार काम करायला हवे. जामियातून 50 पेक्षा अधिक कॉम्रेड निघाले आहेत. या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या चॅटची सत्यता काय आहे. हा तपासाचा विषय आहे. मात्र, हल्ल्याची घटना पाहता हा नियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. संबंधित बातम्या - JNU Protest | गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेलं आंदोलन पोलिसांकडून स्थलांतरित JNU Attack : मोदी-शाहांना जे हवं तेच घडतयं : शिवसेना Majha Vishesh | जेएनयूमधील हिंसाचारात कोणाचा हात ? | ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget