एक्स्प्लोर

JNU Protest | गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेलं आंदोलन पोलिसांकडून स्थलांतरित

जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पोलिसांनी नवीन ठिकाणी हलवलं आहे.

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला आझाद मैदानात हलवल्याची माहिती मिळत आहे. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी नाही. त्यामुळे तुम्ही इथं आंदोलन करू नका, असं आंदोलकांना वारंवार सांगण्यात आले होते. मात्र, तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते म्हणून आम्ही त्यांना आझाद मैदानात हलवल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान, आंदोलकांना आम्ही ताब्यात घेतलं नसून त्यांना हलवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. आझाद मैदानात आंदोलन करण्याची कायदेशीर परवानगी असून त्याठिकाणी सर्व सुधिवा उपलब्ध असल्याचे पोलीसांनी सांगितले. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी)रात्री मास्कधारी हल्लेखोरांनी हैदोस घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. रक्ताने माखलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 20 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू होतं. काय घडलं रविवारच्या रात्री - राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मास्कधारी गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला रुमाल बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या. संबंधित बातम्या : JNU Attack | जेएनयूतील हल्ला पाहून 26/11ची आठवण झाली : मुख्यमंत्री JNU Attack | हल्ल्यात जखमी झालेली जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष कोण आहे? JNU Protest | जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबई, पुण्यात आंदोलन | ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
Bajrang Sonwane : संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
Dharashiv Crime: आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Mhaske : काँग्रेसच्या किती नादी लागाल, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ठाकरेंवर हल्लाबोलSayaji Shinde : संतोष देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्याDhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case :केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूतDhananjay Deshmukh : केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
Bajrang Sonwane : संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
Dharashiv Crime: आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
Raj Thackeray : राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
ब्रेड खाण्याची योग्य वेळ कोणती?
ब्रेड खाण्याची योग्य वेळ कोणती?
Maharashtra Goverment : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी 
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी 
Embed widget