एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तराखंडमध्ये रेल्वेच्या धडकेत हत्तीच्या दोन पिल्लांचा मृत्यू
डेहराडून : उत्तराखंडमध्ये हल्दीरोड रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेच्या धडकेत हत्तीच्या दोन पिल्लांना जीव गमावावा लागला. ही पिल्लं 2 ते 3 वर्षाची आहेत.
उधमसिंह नगर जिल्ह्यात हल्दीरोड रेल्वे स्टेशनजवळ, काठगोदामच्या दिशेने जाणाऱ्या रानीखेत एक्स्प्रेसने रेल्वे रुळावर असलेल्या हत्तीच्या पिल्लांना धडक दिली.
हत्तीची पिल्लं त्यांच्या कळपातून भरकटली होती आणि रेल्वे रुळ ओलांडताना ती ट्रेन खाली आली. दोन्ही पिल्लं मादी आहेत.
दरम्यान, हत्तींसाठी संरक्षित वनक्षेत्रात ही घटना घडल्याने वनविभागमध्ये एकच हलकल्लोळ निर्माण झाला आहे.
उन्हाळ्यात अन्न आणि पाण्याच्या शोधात हत्ती जंगल सोडून मानवी वस्तीत येतात. अशाचप्रकारे हत्तीची पिल्लंही अन्न-पाण्याच्या शोधात इथे आली असावीत. त्याचवेळी ती ट्रेनखाली आली, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement