एक्स्प्लोर
Advertisement
हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्ट अंतर्गत हिजबुल मुजाहिद्दीनला परदेशी दहशतवादी संघटना जाहीर केलं आहे.
नवी दिल्ली : काश्मिर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनला अमेरिकेनं परराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. अमेरिकेच्या रोखठोक पावलामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्ट अंतर्गत हिजबुल मुजाहिद्दीनला परदेशी दहशतवादी संघटना जाहीर केलं आहे. संघटनेचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनला जागतिक दहशवादी घोषित केल्यानंतर दोनच महिन्यात अमेरिकेनं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना उजेडात आणणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे. अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे या संघटनेच्या अमेरिकेतील सर्व संपत्तीवर टाच येणार आहे.
हिजबुलच्या सर्व हालचालींवर आता निर्बंध येणार आहेत. 1989 मध्ये स्थापन झालेली ही संघटना अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement