(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5G technology : भारतात 5G आणि स्मार्टफोनच्या उपलब्धतेसाठी तातडीनं पावलं उचला : मुकेश अंबानी
डिजिटल कनेक्टिव्हिटीमधी आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी 5G च्या रोलआउटला लवकरात लवकर गती देण्यासाठी आणि ते सर्वांना परवडेल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलण्याची गरज आहे.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी भारतात 5G तंत्रज्ञान आणि स्वस्त स्मार्टफोनच्या उपलब्धतेसाठी "तात्काळ धोरणात्मक पावलं" उचलावित अशी मागणी केली आहे. भारतीय मोबाइल काँग्रेसची 2021 मधील परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत बोलताना मुकेश अंबनी यांनी अशी मागणी केली आहे. मागच्या वर्षी 2020 मध्ये झालेल्या परिषदेत बोलताना अंबानी यांनी RIL चे युनिट रिलायन्स जिओ देखील 2021 च्या मध्यापर्यंत 5G क्रांतीसाठी पावलं उचलेल असेल सांगितले होते. त्याचा दाखला देत अंबानी यांनी सांगितले की, आम्ही सध्या 4G आणि 5G ची अंमलबजावणी आणि ब्रॉडबँडवर लक्ष केंद्रीत करत आहोत.
जगभरात डिजिटलची क्रांती होत असताना भारतातही 5G सुरू करण्यासाठीचे आम्ही नियोजन केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सूविधांच्या उपलब्धतेसाठी आमची तयारी सुरू आहे. भारताने लवकरात लवकर 2G ते 4G ते 5G पर्यंत आले पाहिजे. भारतीय लोकांचा सामाजिक, आर्थिक स्थर उंचावण्यासाठी आणि डिजिटल क्रांतीच्या लाभासाठी लोकांपर्यंत 5G पर्यंत पोहोचले पाहिजे. या क्रांतीसाठी 2G ला काही मर्यादा आहेत. त्यामुळे 5G चे रोल-आउट तयार करण्याकडे भारताचे राष्ट्रीय प्राधान्य असले पाहिजे, असे मत मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केले.
"भारताने डिझिटलायझेशनच्या मोठ्या प्रवासाकडे वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी भारतातील सान्यातील सामान्याला परवडणारी सेवा दिली पाहिजे. फक्त सेवा न देता त्याची खात्रीही द्यायला पाहिजे. त्यासाठी फायबर कनेक्टिव्हिटी तयार झाली पाहिजे. असेही अंबानी यांनी यावेळी सांगितले. तंत्रज्ञानात भारत इतर देशांना मागे टाकू शकतो. कारण फायबरमध्ये मर्यादेच्या पलिकडे डाटा आहे. त्यासाठी भविष्याचा विचार करून फायबर कनेक्टिव्हिटी वाढविली पाहिजे."
मुकेश अंबानी यांनी या परिषदेत गेल्यावर्षी म्हणजे 2020 मध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडले होते. डिजिटल कनेक्टिव्हिटीमधी आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी 5G च्या रोलआउटला लवकरात लवकर गती देण्यासाठी आणि ते सर्वांना परवडेल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे. आम्ही 5G इकोसिस्टम विकसित केली असून तंत्रज्ञानाच्या पुढील टप्यात ती जागतिक कंपन्यांसाठी विक्रेता बनू शकेल. असा दावा RIL युनिट रिलायन्स जिओने केला आहे. याशिवाय असा दावा करणारी भारतातील ही एकमेव कंपनी आहे. 5G च्या येण्याने "आत्म निर्भर भारत" मध्ये भर पडेल आणि भारत केवळ चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही तर तो नेटवर्किंग आघाडीचे नेतृत्व करण्यास सक्षम असेल. असा विश्वास अंबानी यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.
"जिओच्या अंतर्गत 20 स्टार्टअप्ससह "कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा आणि मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, व्हर्च्युअल रिअॅलिटी, आरोग्यसेवा" यांमध्ये जागतिक दर्जाची क्षमता निर्माण करण्यासाठी मदत करेल. जिओ आणि गुगलने स्मार्टफोन तयार करण्यासाठी करार केला असून भारतातील सर्व भागांमध्ये स्मार्टफोनची गरज असल्याचे जिओने सांगितले होते.
"भारतातील तब्बल 300 लाख मोबाइल ग्राहक अजूनही 2G मध्येच अडकले आहेत. या ग्राहकांकडे स्मार्टफोन आहे का? याची खात्री करण्यासाठी तातडीची धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांनाही या सुविधांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभ देता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि भारतीय समाजाचे डिजिटलायझेशन जसजसे वेग घेईल तसतशी डिजिटल हार्डवेअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. गरजेच्या या क्षेत्रात आम्ही मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहू शकत नाही.” असे अंबानी म्हणाले मागच्या वर्षी म्हणाले होते.
संबंधित बातम्या
Reliance AGM 2021 Announcement: आम्ही 5G नेटवर्क सुरू करण्यास सज्ज, रिलायन्स जिओकडून मोठी घोषणा
2G मुक्त अन् 5G युक्त भारत, जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन.. जाणून घ्या रिलायन्सच्या वार्षिक बैठकीतील 10 मोठ्या गोष्टी