एक्स्प्लोर

2G मुक्त अन् 5G युक्त भारत, जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन.. जाणून घ्या रिलायन्सच्या वार्षिक बैठकीतील 10 मोठ्या गोष्टी

गुंतवणूकदारांपासून सामान्य लोकांपर्यंत आरआयएलच्या एजीएमची प्रत्येकाल प्रतीक्षा असते. मुकेश अंबानी एजीएममध्ये दरवर्षी काहीतरी मोठ्या घोषणा करतात. यावेळीही त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (AGM) मुकेश अंबानी यांनी बऱ्याच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. गुंतवणूकदारांपासून सामान्य लोकांपर्यंत आरआयएलच्या एजीएमची प्रतीक्षा असते. मुकेश अंबानी एजीएममध्ये दरवर्षी काहीतरी मोठे घोषित करतात. यावेळीही त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. आम्ही तुम्हाला मुकेश अंबानींच्या भाषणातील 10 मोठ्या गोष्टी सांगणार आहे.

आरआयएलच्या मानवतावादी प्रयत्नांनी आनंद दिला
मुकेश अंबानी म्हणाले की मागील वार्षिक सर्वसाधारण सभेपासून आमचा व्यवसाय आणि आर्थिक यश अपेक्षेपेक्षा अधिक आहे. मात्र, या कठीण काळात आरआयएलच्या मानवतावादी प्रयत्नांनी आमच्या व्यावसायिक कामगिरीपेक्षा आम्हाला जास्त आनंद झाला आहे.

Reliance AGM 2021: रिलायन्सची रिटेलमध्ये वेगाने प्रगती; आगामी 3 वर्षात 10 लाखाहून अधिक रोजगार देणार, मुकेश अंबानी यांचा दावा

नवीन ऊर्जा व्यवसायाची घोषणा
2016 मध्ये आम्ही भारतात डिजिटल डिवाइड कमी करण्याच्या उद्देशाने जिओ लाँच केले. आता, 2021 मध्ये आम्ही भारत आणि जागतिक स्तरावर हरित उर्जा विभाजनाला कमी करण्याच्या उद्देशाने आपला नवीन उर्जा व्यवसाय सुरू करीत आहोत.

सौदी अरामकोचे अध्यक्ष रिलायन्स बोर्डामध्ये दाखल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणाले, “स्वतंत्र संचालक म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळावर सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि पीआयएफचे गव्हर्नर यासर अल-रुमायन यांचे मी स्वागत करतो. रुमायन यांचे आमच्या बोर्डात सामील होणे ही रिलायन्सच्या आंतरराष्ट्रीयकरणाची सुरुवात आहे."

Reliance AGM 2021 Announcement: आम्ही 5G नेटवर्क सुरू करण्यास सज्ज, रिलायन्स जिओकडून मोठी घोषणा

जियो फोन नेक्स्टची घोषणा
मुकेश अंबानी म्हणाले की, गूगल आणि जिओने संयुक्तपणे एक यशस्वी स्मार्टफोन जिओ फोने नेक्स्ट विकसित केला आहे, याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. हा एक पूर्णपणे फिचर स्मार्टफोन आहे जो Google आणि Jio या दोन्ही अॅप्लिकेशन्सला सपोर्ट करणारा आहे.

10 सप्टेंबरला लॉन्च होणार  JIO PHONE NEXT
अंबानी म्हणाले, “जियो फोन नेक्स्ट, जियो आणि गूगल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या अँड्रॉइड ओएसच्या ऑप्टिमाइझ्ड व्हर्जनद्वारे संचलित आहे. हा अत्यंत स्वस्त आणि अत्याधुनिक फिचरसह सुसज्ज आहे. येत्या गणेश चतुर्थी म्हणजे 10 सप्टेंबरपासून हा बाजारात उपलब्ध होणार आहे.

Jio Phone Next Announced: मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा! गुगल आणि जिओचा संयुक्त फोन गणेश चतुर्थीला येणार; जगातील सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा

'जगातील सर्वात स्वस्त फोन असेल'
रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणाले, तुम्ही जिओकडून जी अपेक्षा करता त्यानुसार “जिओ फोन नेक्स्ट हा भारतातीलच नाही तर जगातील सर्वात स्वस्त फोन असेल.

'5G जी वर काम करत आहे'
मुकेश अंबानी म्हणाले की आम्ही जागतिक भागीदारांसह 5G इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि 5G उपकरणांची सीरीज विकसित करण्यासाठी कार्यरत आहोत.

भारतला 5G युक्त करणार
जिओ केवळ भारताला 2G मुक्त नाही तर 5G युक्त करण्यासाठी काम करत असल्याचे अंबनींनी सांगितले. डेटा वापरण्याच्या बाबतीत जिओ जगातील दुसर्‍या क्रमांकाचे नेटवर्क बनले आहे. रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर दरमहा 630 कोटी जीबी डेटा वापरला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्के जास्त आहे.

रिटेल सेक्टर मोठे यश
रिलायन्स रिटेलने सांगितले की, 8 पैकी 1 भारतीय रिलायन्स रिटेलमधून खरेदी करतो. रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सर्वात वेगवान झाला आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षी 1500 नवीन स्टोअर उघडण्यात आले आहेत. Apparel Biz मध्ये, 1 वर्षात 18 कोटी युनिक विकले गेले. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समध्ये परिस्थिती बळकट झाली.

रिलायन्स रिटेल 65000 नवीन रोजगार निर्माण
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, रिटेल क्षेत्रात पुढील तीन वर्षात रिलायन्स सुमारे 10 लाख लोकांना नोकरी देईल. यासह ते असेही म्हणाले की, गेल्या एका वर्षात रिलायन्स रिटेलने 65 हजार नवीन रोजगार निर्माण केले आहेत आणि कर्मचार्‍यांची संख्या आता 2 लाखाहून अधिक झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Dog Breeds Ban In India : पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM टॉप 25 न्यूज : 25 April 2024 : ABP MajhaHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंPrithviraj Chavan On Sangli Lok Sabha : मित्रपक्षाने राजकारण केलं : पृथ्वीराज चव्हाणRahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल अमेठीतून तर प्रियांका रायबरेलीतून लढणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Dog Breeds Ban In India : पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
Embed widget