एक्स्प्लोर
Advertisement
UPSC Results : महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी, कनिष्क कटारिया पहिला
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. पहिल्या पन्नासमध्ये महाराष्ट्राचे पाच विद्यार्थी आहेत.
युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राच्या पाच विद्यार्थ्यांना पहिल्या 50 जणांमध्ये स्थान मिळाले आहे. सृष्टी देशमुख - पाचवी, तृप्ती धोडमिसे - 16 वी, वैभव गोंदणे - 25 वा, मनिषा आव्हाळे - 33 वी, हेमंत पाटील - 39 वा.
युपीएससी 2018 परीक्षेत कनिष्क कटारिया(पहिला), अक्षत जैन (दुसरा), जुनैद अहमद (तिसरा), श्रेयांस कुमत (चौथा), सृष्टी देशमुख (पाचवी), शुभम गुप्ता (सहावा), कर्नाटी वरुणरेड्डी (सातवा), वैशाली सिंह (आठवा), गुंजन द्विवेदी (नववी), तर तन्मय शर्मा देशात 10 वा आला आहे. परिक्षेचा निकाल upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement