एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद
‘मुस्लिम महिला आणि पुरुषांनी आपले किंवा कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर टाकणं अनैतिक आहे. कारण की, इस्लाम याला परवानगी देत नाही.’
सहारनपूर (उत्तर प्रदेश) : मुस्लिम पुरुष आणि महिलांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं हे अनैतिक आहे. असं अजब तर्कट दारुल उलूम देवबंद या संस्थने केलं आहे.
फेसबुक, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडियावर पुरुष आणि महिलांनी फोटो अपलोड करणं नैतिक आहे का? असा प्रश्न एका व्यक्तीनं दारुल उलूम देवबंद संस्थेला विचारला होता. होता. याच प्रश्नाला उत्तर देताना देवबंदनं हे अजब उत्तर दिलं आहे.
याबाबत उत्तर देताना देवबंदनं एक फतवा जारी केला आहे. ‘मुस्लिम महिला आणि पुरुषांनी आपले किंवा कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर टाकणं अनैतिक आहे. कारण की, इस्लाम याला परवानगी देत नाही.’
यासंबंधी मुफ्ती तारिक कासमीचं म्हणणं आहे की, 'कोणतीही गरज नसताना पुरुष आणि महिलांचे फोटो काढणं हे इस्लाममध्ये चुकीचं आहे. तर अशावेळी सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिकच आहे.'
सोशल मीडियानं जग आज प्रचंड जवळ आलेलं असताना देवबंद सारख्या संस्थांनी अशा पद्धतीचे फतवे जारी करुन आपली संकोचित वृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement