एक्स्प्लोर
निर्दयी पतीने किरकोळ कारणावरुन पत्नीचं नाक चावलं
तीज या सणासाठी बाजारातून बांगड्या आणताना पूजाचं तिचा पती अर्जुनसोबत रस्त्यातच वाद झाला.
लखनौ : किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीचं नाक चावल्याची घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये घडली आहे. रक्ताने माखलेल्या पत्नीला नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पूजा असं जखमी महिलेचं नाव आहे.
तीज या सणासाठी बाजारातून बांगड्या आणताना पूजाचं तिचा पती अर्जुनसोबत रस्त्यातच वाद झाला. यानंतर रागावलेल्या अर्जुनने महिलेचं नावं चावलं. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाली असून तिच्या नातेवाईंकांनी रुग्णालयात दाखल केलं.
"पती अर्जुन माझ्यावर संशय घेत असे. दारु पिऊन कायम मारहाण करत असे. मारहाणीला विरोध केल्यावर सासरची मंडळी दरदिवशी मला मारायचे. या कृत्यात सासू, दीर, जाऊ हे पतीला सहकार्य करायचे," असं पूजाने सांगितलं.
दोन-तीन दिवसांपूर्वीही पूजा आणि अर्जुन यांचा वाद झाला होता. यानंतर पंचायतही भरली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांची समजूत घालून प्रकरण शांत केलं. पण तरीही पूजाच्या माहेरी जाण्यावरुन अर्जुनचा तिच्यासोबत वाद झाला. माहेरी जाऊ नये यासाठी पूजावर दबाव टाकू लागला.
"वर्षात हाच एक सण येतो आणि त्यासाठी माहेरी गेले नाही तर मैत्रिणी आणि गाववाले काय विचार करतील," असं पूजा म्हणाली. यावरुन संपूर्ण कुटुंबाने रात्री तिला मारहाण केली. सकाळ झाल्यावर पती दारु पिऊन आला. बांगड्या घेऊन देण्याच्या बहाण्याने तो तिला स्वत:सोबत घेऊन गेला आणि गावाबाहेर जाताच तिला मारहाण केली. यानंतर त्याने पूजाचं नाव करकचून चावलं, तिच्या नाकामधून रक्त येऊ लागलं. यानंतर पूजाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement