एक्स्प्लोर

Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदरची ATS कडून चौकशी, प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर; महिला म्हणतेय...

Pakistani Seema Haider ATS Interrogation : उत्तर प्रदेश एटीएसकडून सीमा हैदरची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात सीमा म्हणत आहे की, सचिनच्या प्रेमासाठी सीमा पार करून भारतात आली.

Seema Haider Sachin Love Story : पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरबाबत सध्या अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. दहशतवाद विरोधी पथक (Anti Terrorist Squad) म्हणजेच एटीएस (ATS) कडून सीमा हैदरची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु आहे. सीमाचा गुप्तहेर असण्याच्या आणि दहशतवादाशी तसेच पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएस (ATS) कडून कसून चौकशी सुरु आहे. सीमा नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली, यामुळे भारताच्या सुरक्षेसंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची यूपी एटीएस सातत्याने चौकशी करत आहे.

एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी

सीमा हैदरच्या एटीएस चौकशीत अजून काही महत्त्वाची माहिती समोर आलेली नाही. सीमा हैदर प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर देत आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाला कोणताही प्रश्न विचारला जात असला तरी ती फक्त एकच उत्तर देत आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ती सांगते की, सचिनच्या प्रेमापोटी ती भारतात आली आहे. सीमाने नोएडा पोलिसांना चौकशीदरम्यान हेच उत्तर दिलं होतं. याप्रकरणी सचिन मीना आणि सीमा हैदर यांना समोरासमोर बसवून क्रॉस क्वोटिंगही करण्यात आलं. त्यामुळे आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान कोणतीही मोठी माहिती हाती लागलेली नाही.

पोलिसांकडून कसून तपास सुरु

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने अत्यंत कडक प्रशिक्षण घेतले असावे. त्यामुळे ती एकच उत्तरे देत असून जबाव बदलत नसावी. त्यामुळेच आता पोलीस चौकशीदरम्यान मानसशास्त्रज्ञाला सोबत घेऊन तपास करण्याची शक्यता आहे. जेणेकरून सीमा खोटे बोलतेय की खरं यावर बारकाईने लक्ष ठेवता येईल.

नेपाळमध्ये पहिल्यांदा भेटले सचिन आणि सीमा

उत्तर प्रदेश एटीएसच्या टीमने सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांना एकत्र बसवून अनेक महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे चौकशी केली. यामध्ये त्यांच्या नेपाळमधील भेटीबाबतही प्रश्न विचारण्यात आले होते. पाकिस्तानी सीमा हैदर आणि उत्तर प्रदेशच्या सचिन मीना यांची ओळख ऑनलाईन गेम खेळताना झाली. त्यानंतर ते पहिल्यांदा नेपाळमध्ये एकमेकांना भेटले, असं दोघेही चौकशीत सांगत आहेत.

यापूर्वी सीमाकडून दोन पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. याशिवाय तिच्याकडून एक ओळखपत्रही पोलिसांना सापडलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमा आणि सचिन नेपाळमध्ये भेटले होते, जिथे दोघेही एका हॉटेलमध्ये जवळपास आठवडाभर थांबले होते. त्यानंतर ते दोघे नोएडामध्ये आले.

कोर्टाकडून दिलासा

पाकिस्तानी सीमा हैदर मे महिन्यात नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाली होती. त्यांची नेपाळमध्ये पहिली भेट झाली. त्यानंतर सीमा हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीनासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. सीमाजवळ अनेक फोन आणि इतर गोष्टी सापडल्याने तिच्यावरचा संशय बळावला, त्यानंतर यूपी एटीएसने सीमा हैदरला ताब्यात घेतलं. सीमा हैदर 30 वर्षांची आणि सचिन मीना 22 वर्षांचा आहे. या दोघांना ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी अटक केली होती, पण न्यायालयाने 7 जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला. त्यानंतर आता त्यांची एटीएस चौकशी सुरु आहे. पबजी गेम खेळताना सीमा आणि सचिन यांनी ओळख झाली. त्यानंतर सचिनच्या प्रेमासाठी सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतात आली. यामुळे भारताच्या सुरक्षेचा धोका असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Seema Haider : मोठी बातमी! मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची धमकी, 'सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर...' 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024100 Headlines:  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Embed widget