एक्स्प्लोर

Seema Haider : सीमा हैदर भारत आणि पाकिस्तानची फसवणूक करतेय, पाकिस्तानी मैत्रिणीचा गौप्यस्फोट; म्हणाली...

Seema Haider Sachin Love Story : सध्या पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन यांची लव्ह स्टोरी चर्चेत आहे. आता सीमा हैदरची मैत्रिण असल्याचं सांगत एका पाकिस्तानी तरुणीने मोठ गौप्यस्फोट केला आहे.

Pakistani Seema Haider Latest Update : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय सचिन मीना (Sachin Meena) या दोघांची प्रेमकहाणी (Seema Sachin Love Story) सध्या चर्चेत आहे. सचिनच्या प्रेमासाठी पाकिस्तानी (Pakistan) सीमा भारतात पोहोचली आणि तिने धर्म बदलून लग्न केलं. सीमा आणि सचिन ग्रेटर नोएडामध्ये वास्तव्यास आहेत. सीमा हैदरवर अनेक संशय आहेत, कारण ती बेकायदेशीर पद्धतीने भारतात आली आणि तिच्याकडे कागजपत्रंही नाहीत. एकीकडे सीमा हैदरवर गुप्तहेर आणि पाकिस्तानी सैन्यात अधिकारी असल्याचा आरोप होत असताना आता तिच्या मैत्रिणीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. सीमाची मैत्रीण असल्याचं सांगणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'सीमा हैदर भारत आणि पाकिस्तानची फसवणूक करतेय'

पाकिस्तानी सीमा हैदरची मैत्रिण असल्याचा दावा करणाऱ्या या तरुणीच्या व्हिडीओमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सीमा हैदरची पाकिस्तानी मैत्रीण असल्याचा दावा करणारी तरुणी म्हणाली की, 'ती नाटक करतेय, आज ती हिंदू झाली, उद्या ख्रिश्चन होऊ शकते.' या तरुणीने पाकिस्तानी सीमाची बालपणीची मैत्रीण असल्याचा दावा केला आहे. या पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या तरुणीने म्हटलं आहे की, ती सीमा हैदरला लहानपणापासून ओळखते, ती फसवणूक करत असल्याचास दावाही तिने केला आहे.

सीमा हैदरच्या पाकिस्तानी मैत्रिणीचा गौप्यस्फोट

पाकिस्तानी सीमा हैदरची बालमैत्रीण असल्याचा दावा करणाऱ्या तरुणीने म्हटलं आहे की, ती सीमा हैदरला खूप चांगल्याप्रकारे ओळखते आणि तिची कारस्थान माहिती आहेत. या पाकिस्तानी तरुणीने आरोप केला आहे की, सीमा हैदर फसवणूक करत आहे. ती हिंदू आणि पाकिस्तानची फसवणूक करत आहे. सीमाने इस्लाम सोडला आणि हिंदू धर्म स्वीकारला. पुढच्या काही दिवसांत पुन्हा धर्म बदलून ती ख्रिश्चनही होऊ शकते.

'सीमा सर्वांची फसवणूक करते'

या तरूणीने गौप्यस्फोट करत पुढे सांगितलं आहे की, 'सीमा सर्वांची अशाच प्रकारे फसवणूक करते. तिचे अनेक मित्र (पुरुष) आहेत. ती सर्वांसोबत असंच करते. या तरुणीच्या आरोपांचं सत्र इथेच संपलं नाही तर, सीमा ड्रामा करत असल्याचं तिने म्हटलं. 'ती कुठेही शांत बसणार नाही. सीमाने भारतात क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जाण्याची चर्चा केली होती. पण, तिथे जाऊन तिनं नाटक सुरू केलं आहे', असाही आरोप या तरुणीने केला आहे. 

सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी

पाकिस्तानी सीमा हैदर आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात आली होती. यानंतर सीमाला 4 जुलै रोजी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. पाकिस्ताी सीमा आणि भारतीय सचिन यांची मैत्री पबजी खेळताना झाली. ऑनलाईन गेम खेळताना दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर सीमा सचिनला भेटण्यासाठी सीमा पार करत थेट भारतात पोहोचली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Seema Haider : मोठी बातमी! मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची धमकी, 'सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर...' 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget