Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Congress Rally Against SIR: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश आणि सचिन पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते देखील व्यासपीठावर उपस्थित राहतील.

Congress Rally Against SIR: काँग्रेसकडून निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आज (14 डिसेंबर) दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली होणार आहे. या रॅलीद्वारे काँग्रेस मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या रॅलीला संबोधित करतील. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश आणि सचिन पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते देखील व्यासपीठावर उपस्थित राहतील. माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी देखील या रॅलीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
'वोट चोर - गद्दी छोड़' ✊ pic.twitter.com/rjuVM324cX
— Congress (@INCIndia) December 14, 2025
मतचोरीच्या विरोधात 55 लाख स्वाक्षऱ्या
काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, मतचोरीच्या विरोधात देशव्यापी मोहिमेद्वारे पक्षाने सुमारे 55 लाख स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी पुराव्यांसह मतचोरीचे कसे प्रकार घडत आहेत हे दाखवून दिले आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले, परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही." वेणुगोपाल म्हणाले की, रॅलीनंतर काँग्रेस राष्ट्रपतींना भेटण्याची विनंती करेल आणि 55 लाख स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सादर करेल. लोकशाही आणि निष्पक्ष निवडणुकांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन आहे असे पक्षाचे म्हणणे आहे.
काँग्रेस निदर्शने तीव्र करण्याची तयारी
निवडणूक सुधारणा आणि मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) वरून लोकसभेत सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या जोरदार वादविवादानंतर काही दिवसांतच ही रॅली होत आहे. काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी दावा केला आहे की लाखो लोक या रॅलीला उपस्थित राहतील. त्यांनी सांगितले की, देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलीला मैदानावर जमतील. त्यांनी असेही संकेत दिले की महाआघाडीतील घटक पक्षांचे नेते देखील रॅलीत सहभागी होऊ शकतात.
#WATCH | Visuals from Ramlila Maidan in Delhi, where Congress will hold its 'Vote Chor Gaddi Chhod' maharally later today. pic.twitter.com/HWsRxLT2MC
— ANI (@ANI) December 14, 2025
"व्होट चोर, गद्दी छोड" ही घोषणा
काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नसल्याने "व्होट चोर गद्दी छोड" ही घोषणा देऊन ही रॅली आयोजित केली जात आहे. दरम्यान, भूपेश बघेल यांनी आरोप केला की भाजप आणि निवडणूक आयोग एकत्रितपणे लोकशाही कमकुवत करत आहेत. काँग्रेस नेते उदित राज यांनी या रॅलीचे वर्णन एक जनआंदोलन म्हणून केले आणि म्हटले की हा केवळ पक्षाचा कार्यक्रम नाही तर लोकांच्या हक्कांचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठीचा लढा आहे. त्यांनी सामान्य नागरिकांनाही या रॅलीत सामील होण्याचे आवाहन केले.
इतर महत्वाच्या बातम्या























