एक्स्प्लोर
काळा पैसेवाल्यांना मोठा दणका, बेहिशेबी रकमेवर 50 टक्के टॅक्स

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बेहिशेबी संपत्ती जमा करण्यासाठी बँकांचा रस्ता धरलेल्यांना मोदी सरकारने मोठा दणका दिला आहे. 9 नोव्हेंबरनंतर बँकेत जमा केलेल्या आणि टॅक्स न भरलेल्या रकमेवर तब्बल 50 टक्के टॅक्स लागणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भात प्रस्ताव पारित केला आहे. बेहिशेबी रकमेची माहिती स्वत: दिल्यास 50 टक्के टॅक्स असेल. तसंच जमा केलेल्या मूळ रकमेतील 25 टक्के रक्कम 4 वर्षांसाठी वापरता येणार नाही. मात्र, जर माहिती लपवल्यास 60 टक्के टॅक्स भरावा लागेल. शिवाय दंडाचा भुर्दंडही बसेल. उदाहरणार्थ –
- समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये बेहिशेबी रक्कम आहे. तुम्ही त्या रकमेचा स्रोत सांगू शकत असाल, तर तुम्हाला 50 टक्के टॅक्स भरावा लागेल. शिवाय मूळ रकमेतील 25 टक्के रक्कम 4 वर्षे वापरता येणार नाही. म्हणजेच 1 लाखावर 50 हजार रुपये टॅक्स भरावा लागेल आणि 25 हजार रुपये 4 वर्षे वापरता येणार नाहीत. शिवाय, त्यावर व्याजही मिळणार नाही. मात्र, उर्वरित 25 हजार रुपये तुम्हाला वापरता येतील.
- समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहे. मात्र, तुम्ही त्या रकमेचा स्रोत सांगता आला नाही तर मूळ रकमेवर 60 टक्के टॅक्स आणि 30 टक्के दंड भरावा लागेल. शिवाय, तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. उर्रवरित म्हणजे फक्त 10 टक्के रक्कमच तुम्हाला परत मिळेल. म्हणजेच 1 लाख रुपयांपैकी 60 हजार रुपये टॅक्स आणि 30 हजार रुपये दंड भरावा लागेल. उर्वरित 10 हजार परत मिळतील.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















