Indigo Flight : अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला हदयविकाराचा त्रास! विमानात अचानक श्वास गुदमरला, डॉक्टर बनले 'देव'
Ranchi-Delhi Flight : फ्लाईटमध्ये सहा महिन्यांच्या अचानक बाळाला हदयविकाराचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यावेळी विमानात उपस्थित डॉक्टर मदतीसाठी धावले.
Ranchi-Delhi Indigo Flight : हदयविकाराचा त्रास (Heart Patient) असलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचा (Baby) अचानक विमानात श्वास गुदमरला. फ्लाईटमध्ये अचानक बाळाची तब्येत बिघडल्याने बाळाच्या पालकांसह प्रवासीही घाबरले. यावेळी डॉ. नितीन कुलकर्णी हे त्याच विमानाने प्रवास करत होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवत त्या बाळावर उपचार केले आणि त्याचा जीव वाचवला. इंडिगो फ्लाईटक्रू मेबर्सने सर्तकता दाखलच अनाऊंसमेट केली आणि विमानात कुणी डॉक्टर असल्यास बाळावर उपचार करण्याचं आवाहन केलं. यावेळी झारखंडच्या राज्यपालांचे सरचिटणीस डॉ. नितीन कुलकर्णी बाळाच्या मदतीसाठी पुढे सरसावले.
अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला हदयविकाराचा त्रास
डॉ. नितीन कुलकर्णी हे त्याच विमानाने प्रवास करत होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवत त्या बाळावर उपचार केले आणि त्याचा जीव वाचवला. इंडिगो एअरलाईन्सच्या रांची ते दिल्ली फ्लाईटमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. विमान 30 फूट उंचीवर असताना अचानक सहा महिन्यांच्या बाळाची तब्येत बिघडली. यानंतर केबिन क्रूने अनाऊंसमेंट करत विमानामध्ये डॉक्टर उपस्थित असल्याची विचारणा केली. यावेळी डॉ. नितीन कुलकर्णी आणि डॉ. मोजम्मिल फिरोज यांनी बाळावर उपचार करत मदत केली.
बाळाचा विमानात अचानक श्वास गुदमरला
विमान आकाशात 30 फूट उंचीवर असताना बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे बाळाचे पालक घाबरले होते. यावेळी आयएएस अधिकारी नितीन कुलकर्णी आणि डॉ. मोजम्मिल फिरोज यांनी प्रसंगावधान दाखवलं आणि बाळावर उपचार करण्यासाठी पुढे आले. यानंतन विमानातील ऑक्सिजन आणि इतर उपलब्ध औषधांच्या साहाय्याने डॉक्टरांनी बाळावर उपचार केले. यानंतर बाळाची तब्येत सुधारली आणि त्याला बरं बाटू लागलं. यानंतर डॉक्टरांसह बाळाच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. एका तासानंतर विमान लँड झाल्यानंतर बाळाला वैद्यकिय पथकाच्या देखरेखीखाली नेण्यात आलं आणि ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला.
उपचारासाठीच बाळाचा विमानाने प्रवास
बाळाचे कुटुंब झारखंडमधील हजारीबाग येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बाळाला जन्मजात हृदयविकाराचा त्रास आहे. कुटुंबीय बाळा उपचारासाठीच दिल्लीला घेऊन जात होते. आयएएस अधिकारी नितीन कुलकर्णी यांनी सांगितलं की, बाळाचे कुटुंबीय त्यांच्यासोबत डेक्सोना इंजेक्शन घेऊन गेले होते, यामुळे उपचारामध्ये मोठी मदत झाली. इंजेक्शन आणि ऑक्सिजननंतर, बाळाच्या तब्येतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा आली. यानंतर मुलाच्या हृदयाचे ठोके स्टेथोस्कोपने निरीक्षण केले जात होते. चिमुकल्या बाळाला जीवदान दिल्याबद्दल विमानामधील इतर प्रवाशांनी दोन्ही डॉक्टरांचे अभिनंदन केले.
महत्वाच्या इतर बातम्या :