एक्स्प्लोर

iPhone 15 : आयफोन 15 फ्री मिळवा...! तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर, सावधान...

iPhone 15 Scam : आयफोन 15 विनामूल्य उपलब्ध आहे, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंडिया पोस्टने याबाबत ट्विट करत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

Apple iPhone 15 : ॲपल (Apple) कंपनी नवीन आयफोन 15 (iPhone 15) लाँच केल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. ॲपलने 12 सप्टेंबर रोजी आयफोन 15 सीरिज (iPhone 15 Series) मालिका लाँच केली. या सीरिजमध्ये ॲपल (Apple) ने आयफोन 15 (iPhone 15), आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus), आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) आणि आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) हे नवीन आयफोन लाँच केले. सध्या हे तिन्ही फोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण आयफोन प्रेमींना हे फोन मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीचा फायदा सायबर गुन्हेगारांकडून याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

'आयफोन 15 फ्री मिळवा...'

सध्या सोशल मीडियावर आयफोन 15 संदर्भात एख मेसेज खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये आयफोन 15 फ्रीमध्ये मिळवण्याबाबतची माहिती आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, भारतीय पोस्ट ऑफिस नवरात्रीच्या निमित्ताने लकी ड्रॉमध्ये आयफोन 15 विनामूल्य देईल आणि या लकी ड्रॉमध्ये सामील होण्यासाठी, युजर्संना फक्त व्हॉट्सॲपचा वापर करावा लागेल. यासाठी युजर्सना व्हॉट्सॲपवर काही ग्रुप तयार करून 20 लोकांना हा मेसेज शेअर करावा लागेल. असं केल्या तुम्हाला आयफोन 15 फ्री मिळेल, अशा आशयाचा हा मेसेज आहे. हा मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर, सावधान...

तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर, सावध व्हा. सायबर गुन्हेगारांना हा मेसेज सर्वत्र व्हायरल केला आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर, तुम्ही सावध राहा. भारतीय पोस्ट ऑफिसने या व्हायरल मेसेजबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया पोस्टने याबाबत ट्विट करत लिहीलं आहे की, "कृपया सावधगिरी बाळगा! इंडिया पोस्ट कोणत्याही अनधिकृत पोर्टल किंवा लिंकद्वारे कोणत्याही प्रकारची भेटवस्टू देत नाही."

सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल

दळणवळण मंत्रालयाच्या (Ministry of Communication) अंतर्गत भारतीय पोस्ट विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरील अधिकृत अकाऊंटवर युजर्संना घोटाळ्याची माहिती दिली आहे. भारत पोस्ट भाग्यवान विजेत्यांना नवीन आयफोन 15 (iPhone 15 Free) देत असल्याचा दावा खोटा असून हा एक फिशिंग मेसेज असल्याचं सांगितलं आहे. सायबर गुन्ह्यांसाठी हे जाळं असल्याचं पोस्ट विभागाने सांगितलं आहे.

कोणत्याही माहितीसाठी 'येथे' भेट द्या

इंडिया पोस्टने ट्विट केले आहे की, "कृपया सावधगिरी बाळगा! इंडिया पोस्ट कोणत्याही अनधिकृत पोर्टल किंवा लिंकद्वारे कोणत्याही ॲपमधून कोणतीही भेट देत नाही. इंडिया पोस्टशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला सर्व योग्य तपशील मिळेल.

महत्वाच्या इतर बातम्या : 

Whatsapp Pay : व्हॉट्सॲपवर पैसे पाठवणं मेसेज करण्याइतकं सोपं, व्हॉट्सॲप पेवर अकाऊंट कसं जोडाल? जाणून घ्या स्टेप-बाय स्टेप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget