(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter on Centre : कंटेंट काढून टाकण्यावरून भारत सरकारशी संघर्ष, ट्विटरकडून कायदेशीर लढाईची तयारी
Twitter on Centre : काही उकाऊंट बंद करण्यासह काही मजकूर काढून टाकण्यासाठी भारत सरकारकडून ट्विटरला सतत नोटीस देण्यात येत आहेत. यातूनच ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे.
Twitter on Centre : ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याच्या भारत सरकारच्या मागणीच्या विरोधात ट्विटर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पदाचा गैरवापर केल्याबद्दल ट्विटर भारतीय अधिकाऱ्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी ट्विटरचा न्यायालयीन आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे सरकारसोबतचे मतभेद आणखी वाढू शकतात.
भारत सरकारने काही कंटेंटबाबत ट्विटरला काही सूचना दिल्या होत्या. परंतु, अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांगत ट्विटरकडून भारत सरकारच्या सूचना पाळण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारकडून याबाबत ट्विटरला विचारणा करण्यात आली. काही उकाऊंट बंद करण्यासह काही मजकूर काढून टाकण्यासाठी सरकार ट्विटरला सतत नोटीस देत होते. या नोटिसांमध्ये शीखांच्या आंदोलनाबाबतच्या माहितीचा समावेश आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ही माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे अशा पोस्ट करणारी काही उकाऊंट बंद करण्यात यावीत शिवाय ट्विटरवरील कंटेंट काढून टाकण्यात यावा. परंतु, ट्विटरने भारत सरकारच्या या सूचनांना अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांचे ट्विटरकडून पालन करण्यात आले नाही. दरम्यान, ट्विटरच्या या कायदेशीर युक्तिवादाच्या तयारीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही.
ट्विटरवरून कंटेंट काढून टाकण्यावरून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद नवा नाही. सरकारकडून ट्विटरला सातत्याने कंटेंट काढून टाकण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या. अलीकडेच सरकारने ट्विटरला आणखी एक नवीन नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये सरकारने ट्विटरला इशारा दिला होता की, जर 4 जुलैपर्यंत त्यांच्या जुन्या नोटीसनुसार कारवाई केली नाही, तर त्यांचा इंटरमीडिएरी स्टेटस संपुष्टात येईल. इंटरमीडिएट स्टेटस संपल्यानंतर ट्विटरवर येणाऱ्या सर्व कमेंट्स आणि कंटेंटसाठी कंपनी जबाबदार असेल, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
Twitter Deal : ठरलं! एलन मस्क इतक्या किंमतीला खरेदी करणार ट्विटर
Eknath Shinde : वाढता वाढता वाढे... एकनाथ शिंदेंच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या महिनाभरात दुप्पट