एक्स्प्लोर

Twitter Deal : ठरलं! एलन मस्क इतक्या किंमतीला खरेदी करणार ट्विटर

Twitter Deal : एलन मस्कला Twitter Board of Directors नी दिलासा दिला आहे. ट्विटर बोर्डानं एकमतानं 44 बिलियन डॉलर्समध्ये मस्क यांना खरेदीला मंजुरी दिली आहे.

Twitter Deal : ट्विटरच्या संचालक मंडळानं (Twitter Board of Directors) टेस्ला कंपनीचे सर्वोसर्वा आणि जगातील श्रीमंत व्यक्तीपैंकी एक असलेल्या एलन मस्क यांना मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. ट्विटरनं मंगळवारी यूएस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनकडे या संदर्भात रेगुलेटरी फाइलिंग केली. ट्विटर बोर्डानं एकमतानं 44 बिलियन डॉलर्समध्ये मस्क यांना खरेदीला मंजुरी दिली आहे. 

संचालक मंडळाकडून करार मान्य 

Twitter Board of Directors ला असं आढळून आलं की, विलीनीकरणाचा करार मान्य करण्यासारखा आहे आणि विशेष म्हणजे, हा व्यवहार ट्विटर आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचा आहे. या बातमीनंतर ट्विटरच्या शेअर्सची किंमत जवळपास तीन टक्क्यांनी वाढून 38.60 डॉलर प्रति शेअरवर पोहोचली. 

ट्विटर डील संशयाच्या भोवऱ्यात 

मस्क यांनी मंगळवारी सांगितलं की, ट्विटरसोबत अजूनही काही समस्या आहेत. मस्क यांनी कतार इकॉनॉमिक फोरमला सांगितलं की, ट्विटरवर बॉट्सची खरी संख्या किती आहे? हे जाणून घेण्यासाठी ते अजूनही वाट पाहत आहेत. आपल्याला ट्विटरचे सीईओ व्हायचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ट्विटरवर मोठ्या संख्येनं बॉट्सच्या उपस्थितीमुळे नाराज झालेल्या मस्कनं मे महिन्यात ट्विटर विकत घेण्याचा करार केला होता.

काही दिवसांपूर्वी मस्क यांनी स्पष्ट केलं होतं की, ट्विटरवरील  स्पॅम खाती 5 टक्क्यांपेक्षा कमी असतील तरंच ट्विटर अधिग्रहण करार पुढे जाईल. इलॉन मस्क म्हणाले होते की, ट्विटरवरील सुमारे 22.9 कोटी खात्यांपैकी किमान 20 टक्के खाती 'स्पॅम बॉट्स'द्वारे चालवली जात आहेत. जे ट्विटरच्या दाव्यापेक्षा 4 पट जास्त आहे.

ट्विटरनं 44 अब्ज डॉलरचा करार 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीश एलन मस्क यांनी सुमारे 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली होती. 

दरम्यान, ट्विटर या सोशल नेटवर्किंग (मायक्रोब्लॉगिंग) साईटचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 9 टक्के शेअर खरेदी केल्यानंतर एलन मस्कला ट्वीटरने संचालक मंडळात स्थान दिलं होतं. ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीच स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Elon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा दिला इशारा, डेटा लपवल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दार किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दार किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget