एक्स्प्लोर
जम्मू काश्मिरमध्ये सैन्याकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू काश्मिरमधील अनंतनागमध्ये भारतीय सेनेला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. लष्कराचा कमांडर जिबरानसह तिघा जणांचा भारतीय सेनेने खात्मा केला.

जम्मू काश्मिर : जम्मू काश्मिरमधील अनंतनागमध्ये भारतीय सेनेला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. लष्कराचा कमांडर जिबरानसह तिघा जणांचा भारतीय सेनेने खात्मा केला. सोमवारी संध्याकाळी दक्षिण काश्मिरमध्ये भारतीय सेनेने केलेल्या कारवाईत तिघा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. शौकत लोहार, मुझफ्फर हजाम हे दोघं लपून बसल्याची माहिती आहे. पाकिस्तानी एके 47, एक एसएलआर, एक पिस्तुल अशी शस्त्र तिघांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लष्कर आणि हिजबुलने आदल्याच दिवशी भारतावर जोरदार हल्ला चढवण्याचा इशारा दिला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























