एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू-काश्मीर: GREF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये जीआरईएफ (जनरल रिजर्व इंजिनीअर फोर्स)च्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी आज पहाटे हल्ला केला. या हल्लात तीन कामगारांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सीमेलगत असलेल्या अखनूरमध्ये लष्कराच्या तळावर हा हल्ला करण्याता आला असून यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहितीही समजते आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, ज्यावेळी पहाऱ्यावरील असलेल्या जवानांची ड्युटी बदलत होती त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला. रात्री दोन वाजेच्या दरम्यान हा हल्ला केला. सध्या लष्करानं संपूर्ण परिसर घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सध्या सुरु आहे. लष्करी तळावरील हल्ल्यानंतर या संपूर्ण परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील वर्षी सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्येही दहशतवाद्यांनी लष्कराच्या अनेक तळांवर हल्ला केला होता. सप्टेंबरमध्ये उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. त्यावेळी तब्बल 18 जवान शहीद झाले होते. काय आहे GREF? GREF ही इंजिनिअरिंग फोर्स आहे. ही फोर्स सीमेवरील रोड ऑर्गेनायजेशनचा एक भाग आहेत. हा सिव्हिल इंजिनिअर्सचा एक ग्रुप आहे जो संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. याचं काम सीमेलगत पायाभूत सुविधा तयार करण्याचं आहे.#FLASH J&K: Three GREF personnel have lost their lives in attack on GREF camp in Akhnoor; area cordoned off.
— ANI (@ANI_news) January 9, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement