Target Killing: जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग, उत्तरप्रदेशच्या दोन मजुरांवर हल्ला
काश्मिरमधील दोन मजुरांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघेही उत्तरप्रदेशच्या कन्नोज येथील आहे. मनोज कुमार आणि राम सागर अशी मजुरांची नावे आहेत.
Target Killing In Jammu Kashmir: जम्मू- काश्मिरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केले आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी दोन मजुरांची ग्रेनेड फेकून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही मजूर उत्तर प्रदेशच्या कन्नोज येथील आहेत. मनोज कुमार आणि राम सागर अशी मजुरांची नावे आहेत.
दहशतवाद्यांनी शोपिया येथील हरमन परिसरात हा हल्ला केला. यामध्ये दोन मजूर गंभीर जखमी झाले. जखमी मजुरांना स्थानिक नागरिकांनी आनन-फनन येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एडीजीपी काश्मिर झोनचे विजय कुमार मीडियाशी बोलताना म्हणाले की, लष्कर ए तोयबाचे दहशतवादी इमरान बशीर गनी, हरमन यांनी मजुरांवर हल्ला केला होता. दोन्ही दहशतवादी शोपिया पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस अधिक तपास करत आहे.
Terrorists lobbed hand grenade in Harmen, Shopian in which two labourers namely Monish Kumar & Ram Sagar, both residents of Kannauj, UP got injured. They were shifted to the hospital where they succumbed. Area cordoned off: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) October 17, 2022
मीडिया रिपोर्टनुसार, हल्ला झाला त्यावेळी दोन्ही मजूर एका टीन शेडमध्ये झोपले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
15 ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांवर देखील हल्ला केला. शोपियातील दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार करत हत्या केली. त्यानंतर दहशतवादी फरार झाले. जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरण कृष्ण भट्ट यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर या दहशतवादी संघटनेने घेतली. काश्मिरमध्ये घडणाऱ्या या घटनांमुळं काश्मिरी पंडितांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
काश्मिरी पंडितांकडून जम्मूमध्यो जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत. टार्गेट किंलिंग विरोधात काश्मिरी पंडित आक्रमक झाले आहेत. काश्मिरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगबद्दल काश्मिरमधील लोकांमध्ये संताप आहे. काश्मिरी पंडितांकडून टार्गेट किलिंगविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.