एक्स्प्लोर
कर्नाटक: काँग्रेस वकिलांचा एक प्रश्न, भाजपची तलवार म्यान!
कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभेत शनिवारी 19 मे रोजी म्हणजे उद्याच बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश सुप्रीम कोर्टाने भाजप आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दिले. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे भाजपला मोठा धक्का आहे. याशिवाय उद्या बहुमत सिद्ध करण्यापूर्वी सर्व आमदारांचा शपथविधी पूर्ण करा, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले. कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी, भाजपकडून मुकुल रोहतगी आणि राज्यपालांकडून अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. काँग्रेस वकिलांच्या एका प्रश्नाने भाजप वकिलांना घाम यावेळी काँग्रेसकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. येडियुरप्पांनी आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे. परंतु त्यांच्याकडे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र नाही. जर भाजपकडे पाठिंब्याचं पत्र असेल तर मुकुल रोहतगींनी ती दाखवावीत, असं थेट आव्हान अभिषेक मनू सिंघवींनी दिलं. इतकंच नाही तर संधी मिळाली तर काँग्रेस-जेडीएस उद्याच बहुमत सिद्ध करेल, असं ठणकावून सांगितलं. त्यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली. सिंघवींच्या या युक्तीवादावर भाजप वकील मुकुल रोहतगी यांना ठोस उत्तर देता आलं नाही. त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही, थोडा वेळ द्यावा, सोमवारी बहुमत सिद्ध करु अशी विनवणी केली. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांनी ही विनंती अमान्य करत, उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. उद्याच बहुमत सिद्ध करा सविस्तर बातमी: बहुमत उद्याच सिद्ध करा, येडियुरप्पांना सुप्रीम कोर्टाचा झटका कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 भाजप 104 काँग्रेस 78 जनता दल (सेक्युलर) 37 बहुजन समाज पार्टी 1 कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 अपक्ष 1
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















