(Source: ECI/ABP News/ABP Majha)
corona lockdown | ज्येष्ठ नागरिकांनो घराबाहेर पडू नका, केंद्र सरकारची सूचनावली
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं ही नियमावली जाहीर केली आहे. देशात 60 ते 70 या वयोगटातल्या वृद्धांची संख्या 8 कोटी 80 लाख इतकी आहे. तर 70 ते 80 या वयगोटात 6 कोटी 40 लाख वृद्ध आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा धोका विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना असल्याने देशातल्या 60 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठांसाठी केंद्र सरकारनं काही सूचनावली जाहीर केलेली आहे. या ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये अशा स्पष्ट सूचना या पत्रात आहेत.
या पत्रात ज्यांना श्वसनाचे गंभीर आहेत, जे हार्ट पेशंट आहेत, किडनीचा ज्यांना त्रास आहे अशा ज्येष्ठांनी अधिक काळजी घेण्याच्या सूचना यामध्ये आहेत. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं ही नियमावली जाहीर केली आहे. देशात 60 ते 70 या वयोगटातल्या वृद्धांची संख्या 8 कोटी 80 लाख इतकी आहे. तर 70 ते 80 या वयगोटात 6 कोटी 40 लाख वृद्ध आहेत. वृद्धांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. बाहेरुन येणाऱ्या लोकांना भेटू नये. घरातल्या घरातचं हालचाल करत, योगा किंवा काही हलके व्यायाम प्रकार करावेत अशा सूचना यात आहेत.
Coronavirus | तीन दशकांपासून एकाच घरात लॉकडाऊन; सतिश वैद्य यांची कहाणी
शिवाय सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं पुरेसं पाणी सतत प्यावे अशा सूचना यात आहेत. शिवाय जे लोक घरात अशा आजारी वृद्धांची काळजी घेत आहेत त्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. त्यांना कुठलीही मदत करताना आधी स्वत:चे हात स्वच्छ धुवावेत. घरातले वयोवृद्ध सतत वापरत असलेल्या वॉकर, व्हीलचेअरसारख्या वस्तू नियमितपणे स्वच्छ कराव्यात असंही सांगण्यात आलंय. शिवाय या ज्येष्ठांचा मानसिक आरोग्य नीट राहावं यासाठी त्यांच्याशी सोशल डिस्टन्सिंग सांभाळत संवाद करत राहावा, संगीत, वाचन अशा छंदांमध्ये त्यांनी आपलं मन रमवावं अशाही सूचना सरकारनं केलेल्या आहेत. अशा आजारामध्ये त्यांनी स्वत:ला एकटं ठेवू नये आणि खोलीत बंद करुन स्वत:चे कुठले उपचार करण्याचे प्रकार करु नयेत असंही नियमावलीत सांगण्यात आलंय.
संबंधित बातम्या :
Coronavirus | पुण्यातील कचरावेचक महिलेचं औदार्य, कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 15 हजारांची मदत