(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown 2 | 20 एप्रिलनंतर या ठिकाणी लॉकडाऊन शिथील होणार; आवश्यक सेवांना मिळणार परवानगी
पंतप्रधान मोदींनी देशातील लॉकडाऊन 19 दिवसांनी वाढवला असून आता देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, देशातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 3 मेपर्यंत आपल्या सर्वांना, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावं लागेल. यादरम्यान आपल्याला शिस्तीचं पालनं करायंच आहे, जसं आतापर्यंत आपण करत आलो आहोत. तसेच देशातील प्रत्येक भागावर 20 एप्रिलपर्यंत बारीक नजर ठेवली जाईल. जे विभाग करोनाचे हॉटस्पॉट होणार नाहीत, अशी खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी 20 एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केले जातील, असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
लॉकडाऊन-2मध्ये या गोष्टी असतील वेगळ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की, आता कोरोनाला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत नव्या ठिकाणी पसरू द्यायचं नाही. स्थानिक स्थरावर आता जर एकही रूग्ण वाढला तर आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला हॉटस्पॉटबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यावरही आपल्याला नजर ठेवणं आवश्यक आहे. देशात नवे हॉटस्पॉट वाढणं आपले परिश्रम आणि आपल्या तपस्येला आव्हान देणारं ठरेल.
पाहा व्हिडीओ : 3 मेपर्यंत भारत लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण
मोदीं म्हणाले की, पुढच्या एका आठवड्यात कोरोना विरोधातील लढाईमध्ये नियम आणखी कठोर करण्यात येतील. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, ठिकाण आणि राज्यावर बारिक नजर ठेवली जाईल. तिथे लॉकडाऊनचं किती पालन होत आहे, त्या क्षेत्राने कोरोनापासून स्वतःला कितपत वाचवलं आहे, हे पाहिलं जाईल. तसेच ते म्हणाले की, जी क्षेत्र या अग्निपरीक्षेत सफल होतील, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांची हॉटस्पॉटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता कमी असेल तिथे 20 एप्रिलपासून काही आवश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'स्वतः कोणीही निष्काळजीपणा करायचा नाही आणि इतरांनाही कूर द्यायचा नाही. उद्या यासंदर्भात एक सविस्तर पत्रक जारी केलं जाईल. पंतप्रधानांनी सांगितलं की, 'ज्या व्यक्तींच हातावर पोट आहे. ते माझे कुटुंबिय आहेत. माझ्या प्राथमिक कर्तव्यांमध्ये यांच्या गरजा पूर्ण करणं सर्वोच्च स्थानावर आहे. नव्या गाइडलाईन्स तयार करताना त्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल. सध्या रबी पिकांच्या कापणीची वेळ आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येऊन शेतकऱ्यांचा सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील.'
संबंधित बातम्या :
Lockdown2 | 3 मेपर्यंत भारत लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Coronavirus | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सप्तपदी
PMModi | कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद; जाणून घ्या कधी आणि काय म्हणाले मोदी?