एक्स्प्लोर
मध्यप्रदेशमध्ये SBI च्या एटीएममधल्या नोटांवरचा सिरियल नंबर गायब
भोपाल : नोटाबंदीनंतर देशभरातील काही एटीएम सेंटरमधून बनावट नोटा किंवा खराब नोटा मिळाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पण मध्यप्रदेशमध्ये एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. यात एसबीआयच्या एटीएममधून निघणाऱ्या 500 च्या नोटांवरुन सिरियल नंबरच गायब असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, नोटेची सत्यताही पडताळली जात आहे.
मध्यप्रदेशच्या दमोहमधील नारायण अहिरवार नावाच्या शिक्षकाने एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढले, त्यावेळी त्यांना मिळालेल्या 500 च्या नोटांवरचे सिरियल नंबर गायब असल्याचं दिसलं. यानंतर त्यांनी तत्काळ बँकेत धाव घेतली, बँकेनेही त्यांना या नोटा बदलून दिल्या. पण सिरियल नंबर नसलेल्या नोटा एटीएममध्ये आल्याच कशा असा प्रश्न आता उपस्थीत होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतल्या एटीएम सेंटरमधून 2000 रुपयांच्या बनावट नोटा निघाल्या. यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया ऐवजी चिल्ड्रेन बॅक ऑफ इंडिया लिहले होते. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करुन या प्रकरणात हात असलेल्यांना अटक केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
क्रीडा
Advertisement