एक्स्प्लोर
भारतातील लोकसभा निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाची भीती
मीडियाच्या माध्यमातून रशिया या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतं, असं तज्ञांचं म्हणणं आहे.
मुंबई : भारतात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत रशियाकडून हस्तक्षेप करण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ञांनी व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे तज्ञांनी हा दावा अमेरिकी खासदारांसमोर केला.
भारत आणि ब्राझीलसह अन्य काही देशांमध्ये आगामी काळात निवडणूका होणार आहेत. मीडियाच्या माध्यमातून रशिया या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतं, असं तज्ञांचं म्हणणं आहे.
अमेरिका निवडणुकीतही हस्तक्षेपाचे आरोप
रशियाच्या हॅकर्स आणि गुप्तहेर यंत्रणांनी 2016 साली अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करून डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली, असा आरोप करण्यात आला होता.
याप्रकरणी, अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने 13 रशियन नागरिकांविरोधात काही दिवसांपूर्वी आरोप निश्चित केले. बेकायदेशीरपणे अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप या लोकांवर करण्यात आला.
तंत्रज्ञानाचा वापर करून धोका देणं आणि खोट्या ओळखीचा वापर करणं, अशा स्वरूपाचे आरोप तिघांवर आहेत. याशिवाय 3 रशियन कंपन्यांवरही आरोप आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement