एक्स्प्लोर
कोलकात्यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कचऱ्याच्या डब्यात

कोलकाता: सोनं खरेदी, देवळातल्या दानपेट्या असे सर्व मार्ग बंद झाल्याने जुन्या नोटा फेकण्याचीच वेळ आता काळ्या पैसावाल्यांवर आली आहे. कोलकात्यात आज एका कचऱ्याच्या डब्यात पाचशे आणि हजारोंच्या शेकडो नोटा सापडल्या. कोलकात्यातील गोल्फग्रीन भागातील हा प्रकार असून या सर्व नोटा कचऱ्यात फेकण्याआधी फाडण्यात आल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी नोटांच्या तुकड्यासहित सर्व नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. या आधी पुण्यात 1000च्या नोटा स्वच्छता करणाऱ्या महिलेला कचऱ्याच्या डब्यात सापडल्या होत्या. तर काल गंगानदीतही 1000 रुपयांच्या फाडेलेल्या नोटा नाविकांना सापडल्या होत्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























