Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याची शक्यता
Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
![Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याची शक्यता Rishabh pant will shift mumbai for treatment Know latest Updates Marathi News Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/8d11d6d8c9b8fa99886bb99e93e15bc51672458922965344_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा (India Cricket Team) विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) काही दिवसांपूर्वी अपघात झाला. गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर देहरादूनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण आता पुढच्या उपचारांसाठी पंतला मुंबईत (Mumbai)आणलं जाणार आहे. दरम्यान, सहा दिवसांपूर्वी दिल्लीहून (Delhi) जात असताना रुरकी (Roorkee) येथे कार अपघातात पंतला दुखापत झाली होती. त्यानंतर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. कार अपघातानंतर क्रिकेटपटूच्या गुडघ्याला सतत सूज येत असून वेदनाही होत आहेत. त्यामुळे पंतचा एमआरआय करता आला नाही. दरम्यान, पंतला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर आहेत.
गेल्या सहा दिवसांपासून देहरादूनच्या रुग्णालयात ऋषभ पंतवर उपचार सुरू असून पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईला हलवलं जाणार आहे. ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयकडूनही वेळोवेळी अपडेट्स घेतले जात आहेत. बीसीसीआय या पंतच्या दुखापतीबाबत खूप गंभीर आहे. तसेच, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही पंतला शक्य ती सर्व मदत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशी परिस्थिती पाहता ऋषभ पंतला मुंबईला हलवलं जाऊ शकतं.
दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मॅक्स रुग्णालयात दाखल भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांनी डॉक्टरांकडून ऋषभच्या प्रकृतीसंदर्भात संपूर्ण माहिती घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी ऋषभ पंतची आई आणि बहिणीची मॅक्स हॉस्पिटलमध्ये सुमारे तासभर भेट घेतली. ऋषभच्या उपचारासाठी राज्य सरकार संपूर्ण मदत करेल, असंही त्यांनी सांगितलं होतं.
अपघाताच्या वेळी ऋषभ पंत एकटाच होता गाडीत
अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. पण त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Rishabh Pant car Accident: ऋषभ पंतचा अपघात खड्ड्यामुळे? अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)