एक्स्प्लोर
रिझर्व्ह बँकेकडून नव्या नोटांचा पुरवठा नाही, बँकांचा दावा
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर आज नोकरदार आणि पेंशनधारकांच्या बँक खात्यात पहिलाच पगार/पेंशन जमा होणार आहे. मात्र रिझर्व्ह बँकेकडून पुरेशी कॅश दिली जात नसल्याचा दावा विविध बँकांकडून केला जात आहे.
पगाराच्या काळात एटीएम किंवा बँकेतून लोकांना गरजेपुरताही पैसे देण्यास अडचण होत असल्याचं बँकांचं म्हणणं आहे. परिणामी बँक आणि एटीएमबाहेर रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे.
एका एटीएममध्ये जास्तीतजास्त 44 लाख रुपये भरता येतात. मात्र चलनाचा तुटवडा असल्याने एटीएममध्ये कमी रक्कम भरली जात आहे. रोकड लवकर संपत आहे, पण एटीएम पुन्हा भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे पगाराच्या दिवसात लोकांची अडचण होण्याची शक्यता बँकांनी वर्तवली आहे.
तूर्तास मोठ्या प्रमाणात कॅश उपलब्ध होणं अवघड असल्याने कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने बँकांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement