एक्स्प्लोर
गोऱ्या फोटोमुळं रानू मंडल ट्रोल, 'मेकअप' केलेल्या 'त्या' फोटोमागचं सत्य समोर
रानू मंडल याआधी देखील सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. ज्या सोशल मीडियाने रानू मंडल यांना स्टार केलं त्याच सोशल मीडियावर त्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केलं जात आहे.
![गोऱ्या फोटोमुळं रानू मंडल ट्रोल, 'मेकअप' केलेल्या 'त्या' फोटोमागचं सत्य समोर Ranu Mandal, social media, viral makeup photo गोऱ्या फोटोमुळं रानू मंडल ट्रोल, 'मेकअप' केलेल्या 'त्या' फोटोमागचं सत्य समोर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/21185501/ranu-mandal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: आपल्या आवाजामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळी त्यांच्या आवाजामुळं नाही तर त्यांच्या एका फोटोमुळं त्या चर्चेत आल्या आहेत. या फोटोमध्ये रानू मंडल यांच्या 'ब्राइट' मेकअपची चर्चा होत आहे. रानू मंडल यांचा एक 'ब्राइट' मेकअप केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन त्यांना मोठ्या प्रमाणावर मीम्स आणि जोक्स करुन ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे रानू मंडल यांच्याविषयी माहितीसाठी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जाऊ लागलं आहे. गुगलवर त्यांचा आणि त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
रानू मंडल यांनी केलेल्या मेकअपच्या फोटोची चर्चा सुरु आहे तो फोटो कानपूरचा आहे. रानू मंडल यांना एका सलून संचालिकेने तिच्या सलूनच्या उद्घाटनासाठी बोलावलं होतं. त्यावेळी हा फोटो काढला गेला होता. मेकअप केलेला रानू मंडल यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संचालिकेने खुलासा केला आहे की, हा सोशल मीडियावर व्हायरल केलेला फोटो एडिट केलेला आहे. जो फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये रानू मंडल यांचा चेहरा खूप जास्त गोरा करण्यात आला आहे. हा फोटो खोटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सोशल मीडियावर रानू मंडल यांच्या मेकअपचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कानपूरच्या या सलूनची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे. मात्र ही चर्चा सलून संचालिकेला आजिबात आवडलेली नाही. यामुळे तिच्या सलूनच्या बिझनेसवर देखील विपरित परिणाम झाला आहे.
रानू मंडल याआधी देखील सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. कोलकात्यामध्ये एका दुकानावर एका चाहत्याला त्यांनी सेल्फी घेण्यास मनाई केली होती. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. ज्या सोशल मीडियाने रानू मंडल यांना स्टार केलं त्याच सोशल मीडियावर त्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केलं जात आहे. सध्या त्यांना या फोटोवरुन ट्रोल केलं जात आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या फोटोवरुन टीका केल्या आहेत तर काहींनी त्यांनी कसं राहायचं हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगत त्यांची बाजू देखील घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी बंगालमधील स्टेशनवर गाणं गाणा
ऱ्या
रानू मंडल सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झाल्या. या व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या रानू मंडल यांना संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांनी त्यांना एका अल्बमसाठी गाणं गायला संधी दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)