एक्स्प्लोर
अयोध्या ते रामेश्वरम सफर घडवणारी रामायण एक्स्प्रेस सुरू
दोन वर्षापूर्वी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अर्थसंकल्पामध्ये लवकरच अयोध्येतून रामायण एक्सप्रेस धावणार असल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर आज रामायण एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

दिल्ली: दोन वर्षापूर्वी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली रामायण एक्स्प्रेस आजपासून सुरू झाली आहे. दिल्लीतील सफदरजंग स्टेशनवरून ही रेल्वे रवाना झाली आहे. या रेल्वेच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टेशनवर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी या रेल्वेच्या सर्व सीट आरक्षित झाल्या होत्या. एकूण 800 प्रवाशांना घेऊन ही रेल्वे अयोध्या ते रामेश्वरमपर्यंत रामायणातल्या ठिकाणांची सफर घडवणार आहे. देशात सध्या राजकीय सभा, कोर्ट सगळीकडे 'राम'नामाचा गजर सुरू असताना आता रेल्वेही जय श्रीराम करण्यात मागे नाही, असे दिसून येत आहे. कारण आजपासून सुरु झालेल्या या रेल्वेच्या 16 दिवसाच्या प्रवासात रामाचे जन्मस्थळ अयोध्येपासून रामेश्वरमपर्यंत धावणार आहे. तसेच या रेल्वेचे नाव रामायण एक्सप्रेस ठेवण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अर्थसंकल्पामध्ये लवकरच अयोध्येतून रामायण एक्सप्रेस धावणार असल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर आज रामायण एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. काय आहेत वैशिष्टये?
- रामायण एक्सप्रेसची-रामजन्मभूमी अयोध्यापासून रामेश्वरमपर्यंत 16 दिवसांचा हा प्रवास असेल.
- दिल्लीतून सुरुवात झाल्यानंतर नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयागराज (अलाहाबाद), चित्रकूट, हंपी, नाशिक, रामेश्वरम या ठिकाणी ही ट्रेन थांबणार आहे.
- प्रत्येक व्यक्तीसाठी 15 हजार 600 रुपये तिकीट असणार आहे.
- या पॅकेजमध्ये खाण्यापिण्याची, निवासाची सोयही समाविष्ट असेल. तर पर्यटनस्थळी फिरण्यासाठी काही इतर सेवा रेल्वे उपलब्ध करुन देईल.
आणखी वाचा























