एक्स्प्लोर

VIDEO : शेतकरी महापंचायत सुरु असताना दुर्घटना; राकेश टिकैत यांच्यासह इतर नेतेही मंचावरुन कोसळले

या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंचावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे

जींद : दिल्लीच्या सीमेवर तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यादरम्यान हरयाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महापंचायत सुरु असतानाच मंच अचानक तुटला. त्यामुळे मंचावर उपस्थित सर्व लोक खाली कोसळले. ही घटना घडली तेव्हा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि इतर नेते उपस्थित होते. पण यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाचा :  शेतकऱ्यांची दूरवस्था थांबवा नाहीतर... ; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंचावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. घटनेनंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला मात्र, काही वेळातच पुन्हा महापंचायतीला सुरुवात झाली.

काही वेळातच व्यासपीठ व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा व्यवसपीठावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात, असं म्हणतं राकेश टिकैत यांनी भाषणाला सुरुवात केली.

महापंचायतीत राकेश टिकैत म्हणाले की, या गावातील ग्रामस्थच नेते आहेत, त्यांना कोणताही नेता नाही. त्यांना थांबवून ठेवलं आहे. हे आंदोलन चालूच राहणार आहे म्हणूनच आलो आहे. जमीन वाचवण्यासाठी हा लढा आहे. घरातील भाकरी आणि अन्नधान्य बंद होणार नाही.

जींदच्या कंडेला गावात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात अनेक खाप नेते सहभागी झाले होते. याचं आयोजन तकाराम कंडेला यांच्या नेतृत्वात सर्व जातीय कंडेला खाप यांनी केलं होते.

उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील गाजीपूर सीमेवर राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राकेश टिकैट यांनी शेतकर्‍यांच्या पाठिंबा एकजूट करण्यासाठी जींद येथील महापंचायतीला हजेरी लावली.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यात सुमारे 400 जवान जखमी झाले. या घटनेनंतर गाझिपूरमध्ये सुरू असलेलं आंदोलन संपण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, राकेश टिकैट यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा नवी उर्जा मिळाली.

Mia Khalifa on Farmer Protest: मिया खलिफाचा शेतकऱ्यांना पाठिंबा, म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha : Maharashtra NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaSpecial Report | Ajit pawar Budget | अर्थसंकल्पात कवितांची मैफल,दादांच्या कवितांनी उपस्थितांचं मनोरंजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
Embed widget