एक्स्प्लोर
राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा
मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेनेची भूमिका समजून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी रात्री उशिरा फोन केला. तृणमूल काँग्रेसने नोटाबंदीविरोधात दिल्लीत काढलेल्या मोर्चात शिवसेना सहभागी झाली होती. त्यामुळे राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. ममतांनी बुधवारी राष्ट्रपती भवनापर्यंत आयोजित केलेल्या मोर्चात शिवसेनेचे खासदारही सहभागी झाले होते.
मित्रपक्ष असेलल्या शिवसेनेने नोटाबंदीचा निर्णयाला विरोध करत ममतांना साथ दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. मित्रपक्ष विरोधकांना सामील होऊ नये यामुळे भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका समजून घेण्यासाठी राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली.
राजनाथ यांच्यासोबत चर्चेत उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
बातम्या
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
