एक्स्प्लोर

'लॉकडाऊनमध्ये अनेक चुका, अर्थव्यवस्था कोलमडली', उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी राहुल गांधींची बातचीत

कोरोनाचं (corona) संकट आल्यापासून आणि देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अनेकांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी बजाज उद्योगसमूहाचे राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांच्याशी संवाद साधला.

नवी दिल्ली : आपण कठीण लॉकडाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये अनेक चुका होत्या. यामुळं आपल्याला दोन्ही बाजूंनी नुकसानच झालं. आता आपण या व्हायरसच्या संकटापासून सावरु शकलो नाहीत, मात्र यासोबत अर्थव्यवस्था मात्र कोलमडून पडली आहे, असं उद्योगपती राजीव बजाज यांनी म्हटलं आहे. मला वाटतं लोकांच्या डोक्यातून भीती काढण्याची आधी गरज आहे. यासाठी विचार स्पष्ट असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजीव बजाज यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बजाज म्हणाले की, खूप लोकं महत्वाच्या गोष्टी बोलायला घाबरत आहेत. अशा काळात आपल्याला सहिष्णू आणि संवेदनशील राहून भारतात काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारकडून घोषित आर्थिक पॅकेजवर बजाज म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये सरकारने जे लोकांसाठी दिलं त्यातील दोन तृतीअंश लोकांपर्यंत ते पोहोचलं. भारतात मात्र  10 टक्के लोकांच्या हातातच मदत गेली आहे. ते म्हणाले की आपल्याकडे सत्य सांगण्यात कमी पडलो आहोत. लोकांना कोरोना हा कॅंन्सरसारखा वाटू लागलाय. लोकांचे विचार बदलून त्यांचं जीवनमान पुन्हा रुळावर आणण्याची गरज आहे. यासाठी वेळ लागेल, असंही ते म्हणाले. सामान्य माणसाच्या दृष्टीने लॉकडाऊन खूप कठीण आहे. भारतासारखा लॉकडाऊन दुसरीकडे कुठेच नाही. आपण जपान आणि स्वीडनसारखं धोरण राबवायला हवं होतं, तिथं नियमांचं पालन होत आहे मात्र लोकांना त्रास मात्र होत नाही, असं देखील बजाज यांनी सांगितलं. कोरोनाला रोखण्यासाठीचे लॉकडाऊन वाया गेले- राहुल गांधी  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल बजाज यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget