पंतप्रधान मोदींचा आज केदारनाथ दौरा; 400 कोटींच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचंही अनावरण
PM Modi Kedarnath Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरु झाली आहे.
![पंतप्रधान मोदींचा आज केदारनाथ दौरा; 400 कोटींच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचंही अनावरण prime minister narendra modi will visit kedarnath dham uttarakhand today this is minute to minute program पंतप्रधान मोदींचा आज केदारनाथ दौरा; 400 कोटींच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचंही अनावरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/c1e0dc2cd77e55784ec5c3493f202a2e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi Kedarnath Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा केदारनाथ दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या केदारनाथ दौऱ्यावर जाणार असून त्यानिमित्तानं केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचं लोकार्पण आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरु झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला आठ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत. प्रधानमंत्री संबोधनाचे 87 एलईडी स्क्रीन आणि बिग स्क्रीनवर प्रसारित करण्यात येणार आहे. श्री आदि शंकराचार्य मंदिरात पोहचण्याचा मार्गावर 87 मंदिरात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.
केदरनाथधाम यात्रेच्या क्षणाला ऐतिहासिक करण्यासाठी भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे असे मिळून एकूण 82 मंदिरात साधू, भक्तांना आणि नागरिकांना आमंत्रित केले होते.
येत्या काही महिन्यात उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
पंतप्रधान बनल्यानंतर मोदींचे अनेक केदारनाथ दौरे
2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधानांनी केदारनाथमध्ये पुन्हा विकासकार्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यावेळी परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींनी सलग केदारनाथचे दैरे केले आहेत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन नवं केदारपुरी वसवण्याचा संकल्प घेतला होता. या अनुषंगानं काम सुरु आहे. नव्या केदारपुरी निर्माणाचं काम जवळपास 90 टक्क्यांपर्यंत पूर्म झालं आहे. तसेच, सहा नोव्हेंबर रोजी केदारनाथची दारंही बंद होणार आहेत.
पंतप्रधान मोदींचा केदारनाथ दौरा
सकाळी-सकाळी 6.40 वाजता देहरादूनपासून केदारनाथ धामसाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदी सकाळी 7.35 मिनिटांनी केदारनाथला पोहोचतील. सकाळी आठ ते 8.30 वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी मंदिरात पूजा करतील. पूजा केल्यानंतर मोदी केदारनाथमध्ये सुरु असलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते सकाळी 9.40 वाजता श्री आदि शंकराचार्य समाधी स्थळी पोहोचतील. समाधीचं उद्घाटन आणि आदि शंकराचार्यांची प्रतिमेचं अनावरण करतील. त्यानंतर जवळपास 9.50 वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)