मोदींच्या केदारनाथ पूजेवेळी महाराष्ट्रात 'या' नऊ ठिकाणी पूजा होणार, महत्वाच्या भाजप नेत्यांची उपस्थिती
पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ भेटीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली असून मंदिराला आठ क्विंटल फुलांनी सजावट केली जात आहे. महाराष्ट्रातही नऊ ठिकाणी अशी पूजा केली जाणार आहे.
मुंबई : केदारनाथ येथे श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या समाधी व मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. शंकराचार्य यांनी ज्या ठिकाणी पदस्पर्श केला, मठांची स्थापना केली, तसेच 12 ज्योतिर्लिंग अशा एकूण 82 तीर्थक्षेत्री हा कार्यक्रम देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात नऊ ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर साजरा होणार आहे. या ठिकाणी राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देखील सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातली ही पूजा सकाळी 8.30 वाजता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या नऊ ठिकाणी भाजपचे प्रमुख नेते पूजा करणार आहेत.
1. नाशिक - त्र्यंबकेश्वर- देवेंद्र फडणवीस,
2. कोल्हापूर- शंकराचार्य मठात- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
3. औरंगाबाद- घृष्णेश्वर - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
4. बीड- परळी वैजनाथ – पंकजा मुंडे
5. सोलापूर- पढंरपूर – खासदार स्वामी जय सिध्देश्वर
6. उस्मानाबाद- तुळजापूर - आमदारा राणा जगजितसिंह पाटील
7. पुणे- भिमाशंकर- माजी मंत्री संजय भेगडे
8. नांदेड- माहूर – प्रताप पाटील चिखलीकर
9. हिंगोली- औंढा नागनाथ- आमदार तानाजी मुटकुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर रोजी केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला आठ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत. प्रधानमंत्री संबोधनाचे 87 एलईडी स्क्रीन आणि बिग स्क्रीनवर प्रसारित करण्यात येणार आहे. श्री आदि शंकराचार्य मंदिरात पोहचण्याचा मार्गावर 87 मंदिरात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.
केदरनाथधाम यात्रेच्या क्षणाला ऐतिहासिक करण्यासाठी भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे असे मिळून एकूण 82 मंदिरात साधू, भक्तांना आणि नागरिकांना आमंत्रित केले होते.
येत्या काही महिन्यात उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :