एक्स्प्लोर

पर्रिकरांना अपेक्षित काम करणार, प्रमोद सावंतांनी गोवा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला

घटक पक्षांना सोबत घेऊन उर्वरित 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करून सावंत म्हणाले, मनोहर पर्रिकर हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्याएवढे काम करता येणार नाही. मात्र त्यांना अपेक्षित असलेले काम नक्की करणार आहे.

पणजी : सोमवारी पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी परवरी सचिवालयात येऊन मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. मनोहर पर्रिकर यांचे राज्यात सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करणार असून तळागाळातील लोकांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहू, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामास सुरूवात केली. दरम्यान, उद्या आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असून आम्ही निर्विवाद ते सिद्ध करु, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. सभापतीपदाचा राजीनामा देऊन सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी विद्यमान उपसभापती असलेले मायकल लोबो हंगामी सभापती म्हणून काम पाहणार आहेत,अशी माहितीही सावंत यांनी दिली. घटक पक्षांना सोबत घेऊन उर्वरित 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करून सावंत म्हणाले, मनोहर पर्रिकर हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्याएवढे काम करता येणार नाही. मात्र त्यांना अपेक्षित असलेले काम नक्की करणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळी दोनापावला येथील मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानी जाऊन पर्रिकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पर्रिकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेतले. महालक्ष्मी मंदिरातून मुख्यमंत्री सावंत थेट सचिवालय गाठून मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा घेतला. मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या खुर्ची शेजारी दुसऱ्या खुर्चीवर मनोहर पर्रिकर यांची प्रतिमा ठेवून त्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या कामास सुरुवात केली. प्रशासनाला सक्रिय करून विकास कामे मार्गी लावण्याला आपले प्राधान्य असणार असून त्यासाठी आता पासूनच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन काम सुरु केले असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. विधानसभेत असे आहे पक्षीय बलाबल भाजप 12 गोवा फॉरवर्ड 3 मगो 3 अपक्ष 3 राष्ट्रवादी काँग्रेस 1 काँग्रेस 14 मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाल्याने पणजी आणि म्हापसा येथील जागा रिक्त झाल्या आहेत. त्याशिवाय शिरोडा आणि मांद्रे मतदार संघाच्या आमदारांनी आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने आणखी 2 जागा रिक्त आहेत. 40 आमदारांच्या विधानसभेत 36 आमदार असून बहुमतासाठी 19 आमदारांची गरज भासणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
Sonia Gandhi : 'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Embed widget