एक्स्प्लोर
देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी
देशाच्या मुलींना न्याय नक्कीच मिळेल, गुन्हेगार कुणीही असो, त्याला सोडलं जाणार नाही, असं मोदींनी ठणकावून सांगितलं.
![देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी pm narendra modis statement on kathua and unnao rapes देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/13204900/modi-rape-case.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडलं. देशाच्या मुलींना न्याय नक्कीच मिळेल, गुन्हेगार कुणीही असो, त्याला सोडलं जाणार नाही, असं मोदींनी ठणकावून सांगितलं.
देशाला सुन्न करणाऱ्या या दोन्हीही बलात्कार प्रकरणावर देशाच्या पंतप्रधानांनी मौन बाळगल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्चही काढला. शिवाय त्यांनी ट्वीट करत मोदींना सवालही केला होता. अखेर आज मोदींनी एका कार्यक्रमात यावर आपलं मत मांडलं.
''गेल्या दोन दिवसांपासून ज्या गोष्टींची चर्चा आहे, त्या घटना निश्चितच कोणत्याही सभ्य समाजासाठी लाजिरवाण्या आहेत. एक समाज म्हणून, देश म्हणून आपली मान या घटनांनी शरमेने खाली गेली आहे. देशाला आश्वासन देतो, की या घटनेतील देशाच्या मुलींना पूर्ण न्याय मिळेल, गुन्हेगार कुणीही असो, त्याला सोडणार नाही,'' असं आश्वासन मोदींनी दिलं.
उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण काय आहे?
भाजपचे उन्नावमधील आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला.
खटला मागे न घेतल्यामुळे 3 एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले वडील सुरेंद्र सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवलं. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र सिंह यांना मृत घोषित केलं.
आमदाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. आमदाराच्या दबावामुळे वर्षभरापासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
न्याय न मिळाल्यामुळे रविवारी पीडितेचं कुटुंब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यासाठी गेलं. त्यानंतर बलात्कार पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयने अटक केली.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
10 जानेवारीला मुलगी खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर तिची हत्या केली.
शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.
17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली.
संजी रामला मदत करणं आणि चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित बातम्या :
काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या
उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक
बलात्काराच्या घटनांविरोधात राहुल-प्रियांका मध्यरात्री रस्त्यावर
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, असिफाच्या बलात्कारामागे पाकचा हात
कठुआ बलात्कार : फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मेनका गांधी
उन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)