Pm Narendra Modi : काँग्रेस नसती तर... ; राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांचा हल्लाबोल
Pm Narendra Modi : काँग्रेसमुळे देशाचं नुकसान झालं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. ते राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते.
Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, "देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणं हेच काँग्रेसचं काम आहे. राष्ट्रीय या शब्दावर काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचं नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक काँग्रेसने सुधारली पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.
काँग्रेस नसती तर काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावा लागला नसता. काँग्रेस नसती तर मुलींना जाळण्याची घटना घडली नसती. रस्ते, वीज, पाण्यासारख्या पायाभूत सुविधांसाठी एवढे दिवस थांबावे लागले नसते. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास केला नाही, आता विरोधात आहे तर विकासात अडथळा आणत आहेत,
केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने 50 पेक्षा जास्त राज्य सरकारे बरखास्त केली असा आरोप नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला.
भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असेलेल्या पक्षाचा आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही असून आता तरी काँग्रेसने पक्षात लोकशाहीचा अवलंब केला पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी यावेळी लगावला. दरम्याम, नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सभात्याग केला.
PM Modi : देशातली राज्य सरकारं अस्थिर करणं हीच काँग्रेस हायकमांडची नीती : पंतप्रधान
कोरोना काळात कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकारने घेतली : पंतप्रधान Rajya Sabha
महत्वाच्या बातम्या