एक्स्प्लोर
वाराणसीत पंतप्रधान मोदींचा 7 किमीचा मेगा रोड शो
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीचा मेगा शो आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघात पाहायला मिळणार आहे. आज एकाच दिवशी वाराणसी शहरात पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, राहुल गांधी आणि त्यासोबत डिम्पल यादव आदींच्या रॅली होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत 7 किलोमीटरपर्यंत ही रॅली काढणार असून, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे.
वाराणसीतल्या बीएचयू गेटपासून मोदींची ही मेगा रॅली सुरु झाली. भारतरत्न मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मोदींनी आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली. या रॅलीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. पंतप्रधानांच्या या रॅलीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. या रॅलीनंतर पंतप्रधान मोदी काळभैरवाच्या दर्शनही घेणार आहेत. मोदींच्या या रॅलीला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
पंतप्रधान मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतात.त्यामुळे याठिकाणचा आखाडा त्यांच्यासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेचा आहे. आपल्या मतदार संघाला मोदींनी गेल्या तीन वर्षात तिसऱ्यांदा भेट दिली आहे.
दरम्यान, आज उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. अजून शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान बाकी असून, यासाठी 8 मार्च रोजी मतदान होणार आहेत. तर 11 मार्च रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement