PM Modi : पंतप्रधान मोदी 2 मेपासून विदेश दौऱ्यावर, तीन युरोपीय देशांना देणार भेट, 25 कार्यक्रमांमध्ये सहभाग
PM Modi Foreign Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2 मेपासून विदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी ते जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसला भेट देणार आहेत.
PM Narendra Modi Foreign Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2 मेपासून विदेश दौऱ्यावर आहेत. या विदेश दौऱ्यात पंतप्रधान तीन युरोपीय देशांचा दौरा करणार आहेत. वेळी ते जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसला भेट देणार आहेत. यादरम्यान ते सुमारे 65 तास विदेशामध्ये असणार आहेत. विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान 25 कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सात देशातील आठ नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठक करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान 50 जागतिक व्यावसायिकांशीही संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी 2 मे रोजी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षी होणारा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा
पंतप्रधान मोदी या विदेश दौऱ्यादरम्यान आधी जर्मनी, नंतर डेन्मार्क आणि नंतर काही काळ पॅरिसमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये प्रत्येकी एक रात्र घालवतील. युक्रेनचे संकट सुरू असताना आणि रशियाच्या हल्ल्यांमुळे जवळजवळ संपूर्ण युरोप एकवटला आहे अशा वेळी होणार पंतप्रधान मोदी यांचा दौरा फारच महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सात देशांच्या आठ नेत्यांशी करणार चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 आणि 3 मे रोजी जर्मनीला भेट देणार आहेत. यानंतर 3 आणि 4 मे रोजी ते डेन्मार्कला जाणार असून त्यानंतर तेथून फ्रान्सलाही जाणार आहेत. त्यानंतर, 4 मे रोजी परतीच्या वेळी ते पॅरिसमध्ये काही काळ थांबतील.
महत्त्वाच्या बातम्या :