TATA Group : आता टाटा बनवणार चिप, सेमीकंडक्टर व्यवसायात पदार्पण करण्याची तयारी
Tata Gear Up to Make Chips : देशातील मोठा उद्योग समूह आता सेमीकंडक्टर व्यवसायात पदार्पण करण्याची तयारीत आहे. स्टीलपासून मीठापर्यंत अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत असणारा टाटा समूह आता सेमीकंडक्टर चिप बनवणार आहे.
Tata Group Gear Up to Make Chips : देशातील मोठा उद्योग समूह 'टाटा समूह' (Tata Group) आता सेमीकंडक्टर (Semiconductor) व्यवसायात पदार्पण करण्याची तयारीत आहे. स्टीलपासून मीठापर्यंत अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत असणारा टाटा समूह आता सेमीकंडक्टर चिप बनवणार आहे. टाटा समूहाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. अलीकडे जगभरात सेमिकंडक्टर चिपचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर टाटाचं हे पाऊल फार महत्त्वपूर्ण आहे. कारण भारत सेमिकंटक्टर चिपसाठी आयातीवर अवलंबून आहे. अशात रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे चिपची टंचाई निर्माण झाली आहे. सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे कारपासून कॉम्प्युटरपर्यंत सर्वच उत्पादनांना धक्का बसला आहे. त्यामुळे भविष्यातील अशी परिस्थिती टाळण्यासाठी भारताला चिपसाठी स्वावलंबी होणं गरजेचं आहे.
चंद्रशेखरन यांनी सांगितलं की, 'सेमीकंडक्टर्सची निर्मिती या व्यवसायाकडे टाटा समूम पाहात आहे. सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये आम्ही आधीच अचूक उत्पादन आणि संबंधित असेंब्लीमध्ये प्रवेश केला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टाटा तामिळनाडू सरकारसोबत चिप बनवणारे युनिट स्थापन करण्यासाठी चर्चा करत आहे. टाटाने कारखान्यासाठी तमिळनाडूमध्ये कोईम्बतूरचा प्रस्ताव ठेवला आहे. टाटाने यासंदर्बात कर्नाटक आणि तेलंगणासारख्या राज्यांशीही चर्चा सुरू ठेवली आहे.' याशिवाय टाटा भारताबाहेरही प्लांट स्थापन करणाऱ्या जागेच्या विचारात आहे.'
काय आहे सेमिकंडक्टर चिप?
सेमीकंडक्टर हे विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी चिप आहे. सेमीकंडक्टर ही सिलिकॉनची बनलेली चिप असते. कार, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते स्मार्टफोनपासून ते अवकाशयानापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये याचा वापर होतो. कोरोनाकाळात सेमीकंडक्टरची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत होती. यामुळे अनेक व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. टाटा समूहाला जॅग्वार कारचं उत्पादनही बंद करावं लागलं होतं.
त्यामुळे भविष्यात अशा समस्यांसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी टाटा समुहाने सेमिकंडक्टर चिप बनवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने याआधीच इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक बॅटरी बनवण्याची योजनेची माहिती दिली आहे. याशिवाय टाटा मोटर्सने शुक्रवारी नवी ईव्ही एसयूव्ही 'टाटा अविन्या' लाँच केली आहे. टाटाचे लक्ष जागतिक बाजारपेठेवर असल्याचं चंद्रशेखरन यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Tata Avinya Electric SUV : टाटा मोटर्सच्या नव्या ईव्ही एसयूव्हीची झलक, एका चार्जमध्ये गाठणार 500 किमीहून अधिक अंतर, पाहा भन्नाट लूक
- Shubman Gill : शुभमन गिलची एलॉन मस्ककडे स्विगी विकत घेण्याची विनंती, जाणून घ्या काय आहे कारण?
- Sanjay Raut : जशास तसे उत्तर देणं हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव, संजय राऊतांचा इशारा
- Security Alert : 'या' अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' काम